कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
जयसिंगपूर येथील शिवार कोविड सेंटर येथे डॉ. सुरेश भोसले यांनी माजी खासदार शेट्टी यांची भेट घेतली. यावेळी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा सहा वर्षांच्या कारकिर्दीत केलेल्या प्रगतीचा लेखाजोखा असणारा ‘समृद्धीचा कृष्णा पॅटर्न’ ही पुस्तिका भेट दिली. तेव्हा राजू शेट्टी यांनी त्यांची प्रशंसाही केली.
यावेळी पै. आनंदराव मोहिते, संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, कऱ्हाड दक्षिणचे अध्यक्ष रामचंद्र साळुंखे, विकास पाटील, सांगलीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, संजय बेले, प्रकाश देसाई, उपाध्यक्ष भागवत जाधव, रविकिरण माने, भास्कर मोरे, पंडित संकपाळ, तानाजीराव गावडे, विजय पाटील, देवेंद्र धस-पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी डाॅ. सुरेश भोसले म्हणाले, सहा वर्षांत सरासरी ३ हजार ५० रुपये एवढा उच्चांकी दर दिला आहे, डिस्टलरी युनिटमध्ये वाढ केली आहे. बोगस बाराशे कामगारांना काढून टाकले, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटशी करार करून कृष्णा शक्ती संजीवक तयार केले.