कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
राज्यातील बहुचर्चित सहकार क्षेत्रातील राजकीय दृष्ट्या महत्वाचा असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने 21-0 अशा फरकाने सर्वच्या सर्व जागांवर मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला आहे.
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या 2021- 2026 या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्ताधारी सहकार पॅनल समोर संस्थापक पॅनल व रयत पॅनल यांचे आव्हान होते. परंतु तिरंगी निवडणूक झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी सहकार पॅनेलने निर्विवादपणे वर्चस्व राखत पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली आहे.
कारखान्याच्या मतमोजणी गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता सुरू झाली. यावेळी पहिल्या फेरीचा कल 11 वाजता सहकार पॅनेलच्या बाजूने आला. यामध्ये सहकार पॅनेलचे अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातील उमेदवार विलास भंडारे यांनी 5 हजार 540 मताची आघाडी घेतली होती, ही आघाडी सर्वच उमेदवारांनी शेवट पर्यत राखली. त्यानंतर दुसर्या फेरीत विलास भंडारे यांनी 11 हजार 103 मतांनी विजय संपादन केला. या निवडणुकीत सत्ताधारी गटातील डॉ. सुरेश भोसले, जगदीश जगताप, धोंडीराम जाधव, लिंबाजी पाटील यांच्यासह आणि उमेदवारांनीही 10 हजाराच्या मताधिक्क्याने विजय संपादन केला.
आजचा निकालात संस्थापक पॅनेलला 9 हजाराच्या मताच्या घरातच अडकून राहिले, तर रयत पॅनल तिसऱ्या स्थानावर 5 हजार मतांच्या घरात राहिले असल्याचे पाहायला मिळाली. अशा वेळी सहकार पॅनेलचे सर्व उमेदवार यांनी 20 हजाराकडे आपली वाटचाल केल्याचे पाहायला मिळाले.