कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी
पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना म्हणून कराड तालुक्यातील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. कारखान्याच्या निवडणुकीसाठी जोरदारपणे प्रचार सुरु होता. या प्रचाराची रणधुमाळी आज संपली आहे. उद्या मंगळवारी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या कारखान्याचे कार्यक्षेत्र सातारा, सांगली जिल्ह्यात असून जवळपास 48 हजाराहून अधिक सभासद निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कारखाना निवडणुकीच्या मतदानासाठी कराड येथील निवडणूक कार्यालयातून मतपेट्या नितदान केंद्राकडे आज रवाना करण्यात आल्या, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश अष्टेकर यांनी दिली.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/328085922104450
कराड तालुक्यातील कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी चांगलाच प्रचार केला आहे. कराड तालुक्यातील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी दिग्गज मंडळींनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. या निवडणुकीसाठी प्रशासनानेही जय्य्त तयारी केली आहे. निवडणुकीचे कार्यक्षेत्र पाहता पाच तालुक्यात 148 मतदान केंद्रे असणार आहेत. तब्बल ३५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती मतमोजणीसाठी करण्यात आली आहे. ७४ टेबलवरून मतमोजणी केली जाणार आहे. २१ उमेदवारांचे प्रत्येक प्रत्येक प्रतिनिधीना ओळखपत्रे दिली आहे. त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येकी पेनेलला एक अशा तीन प्रतिनिधींना मतमोजणीसाठी परवानगी दिली आहे.
दोन्ही तालुक्यातील 22 गावे हि संवेदनशील असून त्यातील 15 गावे कराड तालुक्यातीळ तर 8 गावे वाळवा तालुक्यातील आहेत. या निवडणुकीत सत्तधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलकडून डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर त्यांच्या विरोधात संस्थापक पॅनेलकडून कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश भोसले यांनी व रयत पॅनेलकडून डॉ. इंद्रजित मोहिते यांनी आव्हान देत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
कारखान्याच्या निवडणुकीच्या मतदानासाठी मंगळवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वेळ ठेवण्यात आली आहे. प्रशासनाकडून एका मतदान केंद्रावर 270 ते 300 मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर नऊ कर्मचारी राहणार असून एक पोलीस नियुक्त करण्यात आलेले आहेत. मतपत्रिकेच्या बाबत सांगायचं झालं तर सहा गटांच्या सहा व राखीव गटाच्या चार अशा एकूण दहा मतपत्रिका आहेत. 21 शिक्के मारायचे आहेत. मतदान प्रक्रियेसाठी निरीक्षक म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांची नियुक्ती झाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार कऱ्हाड तालुक्यातील रेठरे बुद्रुक, वडगाव हवेली, कोडोली, बेलवडे बुद्र्रकु, काले, आटके, कार्वे, वाठार, विंग, पोतले, शेणोली, उंडाळे, कोळेवाडी, घारेवाडी, धोंडेवाडी, तर वाळवा तालुक्यातील नेर्ले, पेठ, बोरगाव, रेठरे हरणाक्ष, किल्ले मच्छिंद्रगड, कामेरी, लवंडमाची आदी गावे संवदेनशील आहेत. त्या ठिकाणी स्वतंत्र पोलिस बंदोबस्तही देण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या कृष्णा कारखाना निवडणुकीच्या मतदानाची संपूर्ण तयारी हि निवडणूक विभागाकडून करण्यात आलेली आहे.