कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून पाणीपातळीत झपाट्याने वाढ होवू लागल्याने सलग दुसऱ्या दिवशी 4 फुट 9 इंचावर धरणाचे वक्र दरवाजे उचलण्यात येणार आहेत. धरणाच्या वक्र दरवाजातून प्रतिसेकंद एकूण 45 हजार क्युसेक्स पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात काही वेळात सोमवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून सोडण्यात येणार आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आला आहे. विशेषत सांगली शहरातील नदीची पाणीपातळी वाढणार आहे.
कोयना धरणात सध्या 104. 60 टीएमसी पाणीसाठा असल्याने पाणीसाठवण क्षमता लक्षात घेऊन धरणाचे सहा वक्री दरवाजे रविवारी संध्याकाळी 5 वाजता एका फूटावरून अडीच फूट करण्यात आले होते. आता 24 तासात सोमवारी 5 वाजता 4 फूट 9 इंचावर धरणाचे दरवाजे उचलण्यात येणार आहेत. धरणाची एकूण 105. 25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात सध्या 104. 60 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. आता धरणात केवळ 0.65 टीएमसी इतकेच धरण रिकामे आहे. धरणाची साठवण क्षमता व अद्यापही प्रलंबित असलेला पाऊस लक्षात घेता कोयना धरण व्यवस्थापनाने रविवारनंतर सलग दुसऱ्य दिवशी पुन्हा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.
तर सोमवारी संध्याकाळी 5 वाजता सहाही दरवाजे उचलून त्यातून 45 हजार क्युसेक्स पाणी प्रतिसेकंद कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा कोयना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहेत. सोमवारी दुपारी 3 वाजता धरणाची पाणी पातळी 2163 फूट 0 इंच झाली आहे.