कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष्य लागून असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाच्या निवडणूकीत पहिला कल हाती येत असताना जयवंतराव भोसले सहकार पॅनल कडून जोरदार जल्लोष सुरू झाला आहे.
https://www.facebook.com/110886107732644/posts/169378961883358/
भटक्या विमुक्त प्रवर्गाच्या पहिल्या फेरीत सहकार पॅनेल चे अविनाश मधुकर खरात हे आघाडीवर असून आत्तापर्यंत त्यांना 10 हजार 180 मते पडली असून इतर मागास प्रवर्गातुन सहकार पॅनलचेच वसंतराव बाबुराव शिंदे हे 5 हजार 502 मतांनी आघाडीवर आहेत. याच पार्श्वभूमीवर सहकार पॅनल कडून जल्लोष सुरू आहे.
कराड येथील कृष्णा हॉस्पिटल परिसरात सहकार पॅनलच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार जल्लोष करण्यात येत असून जेसीबीच्या साहाय्याने गुलालाची उधळण करण्यात येत आहे.