कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत दणदणीत विजय मिळवलेल्या सहकार पॅनल कडून आज कारखान्या च्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमनची निवड करण्यात आली. कारखान्याच्या चेअरमनपदी डॉ सुरेश भोसले यांची तर व्हाईस चेअरमन पदी जगदीश जगताप यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नवीन निवडुन आलेल्या संचालक मंडळाची आज निवडणुक निर्णय अधिकारी यांनी बैठक घेऊन चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्या निवडी जाहिर केल्या. नुकत्याच झालेल्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक तिरंगी निवडणुकीत डॉ अतुल भोसले यांच्या सहकार पॅनलने सर्वच्या सर्व एकवीस जागा़वर अकरा हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला आहे
मोठ्या मताधिक्याने सभासदाने आम्हाला निवडून दिले असल्याने जबाबदारी वाढली आहे या जबाबदारीची जाणीव नवीन संचालक मंडळाला असून त्यादृष्टीने कारखान्याच्या हितासाठी व प्रगतीसाठी लगेचच कार्यरत होत असल्याची प्रतिक्रिया चेअरमन निवडीनंतर डॉक्टर सुरेश भोसले यांनी दिली