नवी दिल्ली | पत्रकार, लेखक व मानवाधिकार कार्यकर्ते कुलदीप नय्यर यांचं दिल्ली येथे बुधवारी रात्री निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राचे संपादक म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. बियोंड दि लाईन्स, इंडिया आफ्टर नेहरू आणि आणीबाणी काळातील काही पुस्तकांसह १५ पुस्तकांचं लेखन त्यांनी केलं होतं. पत्रकारितेतील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी आठव्या रामनाथ गोयंका पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. ब्रिटिश दूतावासातील उच्चपदस्थ अधिकारी म्हणूनही त्यांनी सेवा बजावली. आणीबाणी काळातील रोखठोक भूमिका अन मिसा कायद्यांतर्गत झालेला तुरुंगवास या त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना होत.