हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कॉमेडियन कुणाल कामरावर देशाच्या चार विमान कंपन्यांनी विमान प्रवासाची बंदी घातली आहे. परंतु त्याच्या वरील बंदीचा एका व्यक्तीला फटका बसला आहे. योगायोगाने त्या व्यक्तीचे नाव कुणाल कामराच आहे. या घटनेतील कुणाल कामरा हा अमेरिकेच्या बोस्टनमधील रहिवासी असून तो सध्या भारतात आपल्या कुटूंबाला भेट देण्यासाठी आला आहे.
३ फेब्रुवारीला कुणाल कामरा हे एअर इंडियाच्या विमानाने जयपूरहून मुंबईला येत होते. त्यांच्याकडे विमानाचे सुद्धा तिकीट होते. मात्र, ज्यावेळी ते आपली फ्लाइट पकडण्यासाठी गेले, तेव्हा त्यांचे तिकिट रद्द करण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. एअर इंडियाचे हे उत्तर ऐकून कुणाल कामराला धक्काच बसला. नावाशी साधर्म्य असेलेल्या कुणाल कामराला विनाकारण नाहक त्रास सहन करावा लागला.
गेल्या आठवड्यात इंडिगो एअरलाइन्सच्या प्रवासा दरम्यान कॉमेडियन कुणाल कामराने त्याच विमानाने प्रवास करणाऱ्या पत्रकार अर्णब गोस्वामीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी त्याच्यावर विमान कंपन्यांनी प्रवासबंदी घातली होती. या कंपन्यांमध्ये एअर इंडिया, स्पाइसजेट आणि गो एअरचा समावेश आहे.
अमेरिकेतून आलेल्या कुणाल कामराला याची माहिती होती. परंतु, या बंदीचा आपल्याला भविष्यात मनस्ताप सहन करावा लागेल याची कल्पना त्याला नव्हती. कुणाल म्हणाले की, ”मी जेव्हा चेक-इन काउंटरवर पोहोचले तेव्हा मला तुमचे पीएनआर रद्द केलं असल्याचं सांगितल. जेव्हा मला त्याचे कारण जाणून घ्यायचे होते तेव्हा त्यांनी सांगितले की माझे नाव ब्लॅकलिस्ट आहे, मला त्याचे कारण माहित होते, परंतु त्यांनी मला का ब्लॅकलिस्ट केले गेले हे मला समजले नाही. “
अमेरिकन आयडीमुळे प्रकरण मिटलं
कुणाल कामरा म्हणाले की, त्यांच्यासाठी हा एक वाईट अनुभव होता. तथापि, विमान कंपनीने त्यांना खूप मदत केली. माझ्याकडे बराच वेळ होता म्हणून हा प्रश्न सुटला. कामरा म्हणाले, “मला उड्डाणापूर्वी याबद्दल माहिती दिली गेली नव्हती. तसेच विमान कंपनीनेही याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. सर्वात मोठी समस्या ही आहे की तुम्ही एकाच नाव असल्यामुळे एखाद्याच तिकीट कसं रद्द करू शकता? बर्याच लोकांचे समान नाव असू शकते. “
कुणाल म्हणाले की, त्यांना दोन आयडी कार्ड दाखवावे लागले त्यानंतरच त्यांना एअर इंडियाच्या विमानात चढता आले. ते म्हणाले की मी जेव्हा एअरलाइन्सना आधार कार्ड दाखविले तेव्हा त्यांनी ते मान्य केलं. परंतु जयपूर विमानतळावर सुरक्षारक्षकांनी ते अमान्य केलं. त्यामुळं मला माझं अमेरिकन ओळखपत्र दाखवाव लागलं. त्यानंतर त्यांनी ते मान्य करण्यास सहमती दर्शविली. जयपूर विमानतळावरून मंजुरी मिळाल्यानंतरच त्यांचा प्रवास पूर्ण होऊ शकला.
एअर इंडियाचे स्पष्टीकरण
एअर इंडियाचे प्रवक्ते धनंजय कुमार म्हणाले की,”कॉमेडियन कुणाल कामरा एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करू शकत नाही. हे आमच्या सिस्टममध्ये नोंदणीकृत आहे, म्हणून त्यांचे नाव देखील आपोआप नाकारले गेले. परंतु सर्व गोष्टी तपासल्यानंतर संबंधित प्रवाश्याला विमानात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.