अर्णब गोस्वामीला विमानत केलेल्या शाब्दिक शेरेबाजीमुळे कुणाल कामरावर ६ महिने विमानप्रवास बंदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । स्टॅन्ड अप कॉमेडिअन कुणाल कामरा आणि पत्रकार अर्णब गोस्वामी एकाच विमानातून प्रवास करत होते. या प्रवासावेळी कुणाल कामराने विचारलेल्या काही प्रश्नांकडे अर्णब गोस्वामीने दुर्लक्ष केलं. त्याच्या या वागण्यावर संतापलेल्या कुणाल कामराने अर्णबला प्रश्न विचारणारा एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

या प्रकाराची गंभीर दखल इंडिगो एअरलाईन्स आणि एअर इंडियाने घेतली असून कुणाल कामराच्या विमानप्रवासावर निश्चित काळासाठी बंदी घालण्याचा निर्णय दोन्ही कंपन्यांनी घेतला आहे. हरदीप सिंग पुरी यांनी याबाबत खेद व्यक्त केला असून प्रवाशांच्या शांततेशी आणि सुरक्षिततेशी खेळण्याचा प्रकार निंदनीय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या प्रकारावर कारवाई करण्याची विनंती केल्यानंतरच एअरलाईन्स कंपन्यांनी हा निर्णय घेतला.

दरम्यान मी विचारलेल्या प्रश्नांना नीट उत्तरं न दिल्याने मला असं करायची वेळ आली असं कामरा म्हणाला. टीव्ही चॅनेलवर रोहित वेमुलाची जात काढल्याचा जवाब विचारण्यासाठीच मी असा प्रकार केल्याचं स्पष्टीकरण कामराने व्हिडीओमध्ये दिलं आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

दिल्ली वासियांनो, विनोद तावडेंना सरकारी शाळा दाखवा, छोले बटूरे खाऊ घाला; अरविंद केजरीवालांनी उडविली विनोद तावडेंची खिल्ली

बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालाचा भाजपमध्ये प्रवेश?

यंदाच्या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांकडून सर्वसामान्यांच्या ‘या’ असतील अपेक्षा