हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पदवीचे शिक्षण झाले कि आपणही एखाद्या सरकारी खात्यात नोकरीला लागावं, अशी प्रत्येक पदवीधर युवक, युवतीची अपेक्षा असते. सरकारी नोकऱ्या मिळविण्यासाठी लाखो युवक, उमेदवार स्पर्धा परीक्षा देतात. काहीजण यशस्वी होतात तर काहींच्या पदरी निराशा येते. ज्यांना सरकारी नोकरी मिळाली आहे ते त्या नोकरीत खुश नसतात मग मोठं अधिकारी होण्याची स्वप्ने पाहतात. असेच स्वप्न रेवाडी शहरातील शक्तीनगर येथील कुणाल यादवने पाहिलं आणि त्याने एक नाही दोन नाही तर तब्बल आठ सरकारी नोकरीच्या ऑफरवर लाथ मारत IAS अधिकारी झाला. पाहूया त्याचा प्रेरणादायी प्रवास…
रेवाडी शहरातील शक्तीनगर येथील रहिवासी असलेल्या कुणाल यादवने आपल्या यशाने हे सिद्ध केले आहे की तुमच्या स्वप्नांसमोर अडथळे येऊ शकत नाहीत. नोकरीसोबतच त्यांनी UPSC परीक्षेची तयारी केली आणि त्यातही ते यशस्वी झाले.
अभ्यासात कठोर परिश्रम
शिक्षण घेऊनही नोकरी करणाऱ्या कुणालच्या अभ्यासाबाबत सांगायचे झाले तर नोकरी सोबतच यूपीएससी परीक्षेची तयारी केली. कुणाल सुरुवातीपासूनच अभ्यासात खूप हुशार होता. तो जैन पब्लिक स्कूलमधून बारावीच्या बोर्ड परीक्षेत नॉन मेडिकल प्रकारात जिल्ह्यामध्ये अव्वल ठरला. यानंतर कुणालने दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून B. Sc शिक्षण पूर्ण केले. त्याने नॉन-मेडिकल स्ट्रीममध्ये रसायनशास्त्राचे शिक्षण घेतले आहे.
तब्बल सात वर्ष केले कष्ट
IAS कुणाल यादवने 2015 मध्ये पदवीनंतर प्रशासकीय सेवेत नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न सुटू केले. त्यादृष्टीने त्याने तशी तयारीही केली. 2015 मध्ये त्याने पहिल्यांदा SSC CGL परीक्षा उत्तीर्ण केली. पण त्याला ही नोकरी आवडली नाही म्हणून त्याला त्यात जॉईन व्हायचे नव्हते. नंतर त्याने स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पीओ पदासाठी अर्ज केला आणि त्यातही त्याची निवड झाली.
अनेक सरकारी परीक्षेत मिळवलं यश
कुणाल यादवने UPSC परीक्षेपूर्वी इतर अनेक सरकारी परीक्षा दिल्या होत्या. स्टेट बँकेनंतर त्याची आर्मीमध्ये स्टेशन मास्टर तसेच असिस्टंट कमांडंट या पदासाठीही निवड झाली, पण त्यांनी दोन्ही नोकऱ्या न जुमानता UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. नोकरीसोबतच त्यांनी IAS होण्याची तयारीही सुरू ठेवली. 2018 मध्ये तो पहिल्याच प्रयत्नात पूर्व परीक्षा पासही झाला. IAS कुणाल यादवने 2020 मध्ये UPSC परीक्षेच्या दुसऱ्या प्रयत्नात 185 वा क्रमांक मिळविला. IAS प्रशिक्षणानंतर, 2021 मध्ये, त्यांची दिल्ली येथे आयकर विभागात निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली.
दररोज न चुकता केला 12 तासाचा अभ्यास
कुणालला माहित होत कि मोठ्या अधिकाऱ्याच्या परीक्षेत पास व्हायचं असेल तर जास्तीत जास्त अभ्यास हा केला पाहिजे. त्यासाठी त्याने दररोज 10 ते 12 तास अभ्यास सुरु केला. त्यानंतर त्याने यूपीएससी परीक्षा 2020 च्या दुसऱ्या प्रयत्नात संपूर्ण भारतात 185 वा क्रमांक मिळविला. IAS प्रशिक्षणानंतर, 2021 मध्ये त्याची दिल्लीच्या आयकर विभागात निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली.