बेबुसराईमध्ये कन्हय्या कुमारचा होणार पराभव !

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पटना ( बिहार ) |संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार मधील बेबुसराई मतदारसंघातून भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे उमेदवार कन्हय्याकुमार यांना भाजपचे गिरीराज सिंह झटका देवू शकतात. सुरुवातीला कन्हय्याच्या विजयाची शक्यता सर्वांनीच पक्की मानली होती. मात्र एक्सिट पोल हाती येताच कन्हय्या कुमारच्या लोकसभेची वाटचाल बिकट असल्याचे जाणवू लागले आहे.

काँग्रेसला धक्का! दक्षिणेतील बड्या नेत्याने टाळला शरद पवारांचा फोन

महाआघाडीकडून कन्हय्या कुमार यांना पाठिंबा मिळणार असतानाच या ठिकाणी राष्ट्रीय जनता दलाने आपल्याला उमेदवार द्यायचा आहे असा हट्ट धरला. त्यांच्या हट्टापुढे काँग्रेसने नमते घेतले आणि महाआघाडीचा घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाचा उमेदवार कन्हय्या कुमारच्या विरोधात निवडणुकीला उभा राहिला.

एक्झिट पोलमध्ये पराभव सांगितल्यानंतर, अमोल कोल्हे म्हणतात….

राजद कडून तन्वीर हसन यांना उमेदवारी देण्यात आली. राजदचा उमेदवार मुस्लिम असल्याने या मतदारसंघात निर्णायक ठरणाऱ्या मुस्लिम मतांचे विभाजन झालेले. तर कन्हय्या कुमार आणि गिरीराज सिंह ज्या जात घटकातून येतात त्या भूमिहार समाजाची या मतदारसंघात ४ लाखाहून अधिक मतदान या मतदारसंघात आहे. त्यामुळे कन्हय्या कुमारच्या एकगठठा मतांनी सुरुंग लावण्यास भाजपला यश आले आहे. अशा सर्व क्लिष्ट समीकरणात कन्हय्या कुमारच्या जमेची बाजू म्हणजे त्यांच्या भाषण शौलीमुळे त्यांच्याकडे तरुण वर्ग आकर्षित झालं आहे. हि जरी जमेची बाजू असली तरी निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक असणारी रसद कन्हय्या कुमार यांना कमी पडली अशी चर्चा आहे. तर हायटेक प्रचार तंत्रावर स्वार झालेली भाजप पुढे निघून गेली असे म्हणता येईल. तूर्तास अवघ्या काही तासावर येऊन ठेपलेल्या निकालाची वाट बघणेच उचित ठरणार आहे.