Ladakh Standoff: भारत-चीन सैन्याने पूर्व लडाखमधील गोगरा येथून घेतली माघार, चर्चेच्या 12 व्या फेरीत झाली सहमती

0
36
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारत-चीन सीमेवरील माघारी संदर्भात भारतीय लष्कराचे एक मोठे स्टेटमेंट आले आहे. भारत आणि चीनच्या सैन्याने पूर्व लडाखच्या गोगरा भागातून माघार घेतली आहे. दोन्ही बाजूंच्या चर्चेच्या 12 व्या फेरीत झालेल्या सहमतीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली आहे. गोगरा येथील तात्पुरती बांधकामेही काढण्यात आली आहेत. भारतीय लष्कराने शुक्रवारी ही माहिती दिली. दोन्ही बाजूंनी बांधलेली इतर पायाभूत सुविधा नष्ट केल्याचे लष्कराने सांगितले आणि याचीही पुष्टी झाली आहे.

लष्करी चर्चेच्या शेवटच्या फेरीत, दोन्ही पक्षांनी हॉट स्प्रिंग्स, गोगरा आणि डेपसांग येथे सैन्य मागे घेण्यासह, या क्षेत्रातील तणाव कमी करण्याच्या व्यापक उद्देशाने चर्चा केली. तथापि, सैन्य मागे घेण्याच्या दिशेने कोणतीही प्रगती झाली नाही. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये दोन्ही बाजूंनी सैन्य आणि मुत्सद्दी चर्चेच्या मालिकेनंतर पांगोंग तलावाच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यांवरून सैन्य आणि शस्त्रे मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

चर्चेची 12 वी फेरी सुमारे 9 तास चालली
कोर कमांडर स्तरीय चर्चेची 12 वी फेरी 31 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता पूर्व लडाखमधील चिनी बाजूच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) मोल्दो सीमा पॉईंट वर सुरू झाली आणि संध्याकाळी 7.30 वाजता संपली. सुमारे 9 तास चाललेल्या या बैठकीचा उद्देश 14 महिन्यांहून अधिक काळातील प्रदेशातील वाद संपवणे हा होता. बैठकीदरम्यान भारताने हॉट स्प्रिंग्स, गोगरा आणि डेपसांग येथील सैन्य मागे घेण्याचा आग्रह धरला. यापूर्वी लष्करी चर्चेची 11 वी फेरी 9 एप्रिल रोजी LAC च्या भारतीय बाजूच्या चुशूल सीमा पॉईंट वर आयोजित करण्यात आली होती आणि हि चर्चा सुमारे 13 तास चालले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here