हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मध्यप्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी महिला मतदारांवर लक्ष केंद्रित करून लाडली बहना ही योजना सुरू केली आहे. या योजनेचा फायदा त्यांना विधानसभा निवडणुकीत झालेला देखील पाहायला मिळाला. त्यामुळे आता लाडली बहना योजना महाराष्ट्र देखील सुरू करण्यासाठी शिंदे गटाने हालचाली सुरू केल्या आहे. शिंदे सरकार लवकरच या योजनेवर विचार करून तिला महाराष्ट्रात देखील सुरू करणार आहे. याबाबतची माहिती शिंदे गटाचे प्रवक्ते वैजनाथ वाघमारे यांनी दिली आहे.
खरे तर लाडली बहना या योजनेमुळेच मध्य प्रदेशात भाजपने एखादी विजय मिळवला आहे. त्यामुळे आता या योजनेला महाराष्ट्रात देखील राबवण्याचा सरकारचा मानस आहे. सध्या महाराष्ट्रातली एक लाडकी योजना सुरू आहे. मात्र लाडली बहना योजना सुरू केल्यानंतर सरकारला त्याचा मोठा फायदा होईल असे म्हटले जात आहे. लाडली बहना या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला एक हजार रुपये देण्यात येतात. या योजनेसाठी 21 वर्षे ते 60 वयोगटातील प्रवर्ग, मागासवर्गीय, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक, विधवा अशा महिला अर्ज करू शकतात.
दरम्यान, शिवराज सिंह चौहान यांच्याकडून सुरू करण्यात आलेल्या लाडली बहना या योजनेअंतर्गत आजवर 1 कोटी 31 लाखांहून अधिक महिलांनी लाभ घेतला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये याच योजनेमुळे मध्यप्रदेशात भाजपने वर्चस्व कायम ठेवले आहे. आता भाजपची हीच रणनीती वापरून शिंदे सरकार देखील राज्यात लाडली बहना योजना राबवण्याचा विचार करत आहे. अद्यापही योजना कशा पद्धतीने राबवण्यात येईल यासाठी किती कोटींची तरतूद केली जाईल याबाबतची माहिती समोर आलेली नाही.