संतापजनक ! महिलेने भररस्त्यात केली रिक्षाचालकाला मारहाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नोएडा : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी नोएडामध्ये महिलेला शिविगाळ करणाऱ्या श्रीकांत त्यागीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटकसुद्धा केली आहे. महिलेला घाणेरड्या शिव्या देण्यासोबत धमकावण्याचा आरोप श्रीकांत त्यागीवर करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये एका महिलेने भर रस्त्यात गरीब रिक्षा चालकाला शिविगाळ करत त्याला मारहाण (lady beating rikshaw driver) केली आहे. या मारहाणीचा (lady beating rikshaw driver) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या महिलेच्या विरोधात सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी या महिलेवर कठोर कारवाई (lady beating rikshaw driver) करण्यात यावी अशी मागणी लोकांकडून करण्यात येत आहे.

काय घडले नेमके ?
गरीब रिक्षा चालकाची आणि महिलेच्या गाडीची धडक झाली. त्यामुळे संतापलेल्या महिलेने ई-रिक्षा चालकाला अक्षरशः फरफटत आणलं आणि त्याला शिविगाळ करत जाब (lady beating rikshaw driver) विचारला. गाडीला झालेल्या नुकसानीवरुन ही महिला रिक्षा वाल्यावर राग काढत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. गरिब रिक्षावाला आपण घाईत असल्याचे सांगत हात जोडतो, संतापलेल्या महिलेला समजावण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो. पण महिला त्याचे जराही ऐकून न घेता गरीब रिक्षावाल्याला जबर मारहाण (lady beating rikshaw driver) करते. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर महिलेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच या महिलेच्या विरोधात पोलिसांत तक्रार (lady beating rikshaw driver) दाखल करण्यात आली. ज्या ठिकाणी श्रीकांत त्यागी प्रकरण घडले होते त्याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे प्रकरण घडले आहे. नोएडा फेज टू पोलिस ठाण्याच्या हद्दी घडलेल्या या घटनेने महिलेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?