Laganiya Hanuman : ब्रह्मचारी हनुमंताच्या ‘या’ मंदिरात होतात प्रेमविवाह; स्वतः बजरंगबली घेतात लग्नाची जबाबदारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Laganiya Hanuman) जगभरात अनेक मंदिरं अशी आहेत ज्यांचा इतिहास अद्भुत आणि आश्चर्यकारक आहे. असंच एक हनुमंताचं मंदिर अहमदाबादमध्ये स्थित आहे. देशभरात अनेक ठिकाणी हनुमंताची वेगवेगळ्या नावाने मंदिरे प्रसिद्ध आहेत. त्यांपैकी हे एक मंदिर अहमदाबादच्या मेघाणी नगर परिसरात आहे. हे मंदिर अत्यंत प्राचीन असून ‘लगनिया हनुमान’ या नावाने प्रसिद्ध आहे. या नावामागे एक विशेष कारण आहे. ते कारण असं कि, आयुष्यभर ब्रह्मचार्याचे पालन केलेल्या हनुमंताच्या या मंदिरात प्रेमविवाह होतात. इथे झालेली लग्न मोडत नाही, अशी इथल्या लोकांची मान्यता आहे.

‘लगनिया हनुमान’ मंदिर (Laganiya Hanuman)

गुजरातमध्ये अहमदाबादच्या मेघाणी नगर परिसरात वसलेल्या या ‘लगनिया हनुमान’ मंदिरात गेल्या बऱ्याच वर्षांपासून प्रेमी युगलांच्या लग्नाचा बार उडवला जातोय. हे अत्यंत प्राचीन मंदिर असून इथे लग्न करणाऱ्या जोडप्यांच्या लग्नातर कोणतीही अडचण व बाधा येत नाही. इतकंच नव्हे तर, इथे लग्न करणाऱ्या जोडप्यांना बजरंगबलीचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात त्यांना सर्व प्रकारची सूख उपभोगता येतात. जगाचा विरोध पत्करून प्रेम करणाऱ्या बऱ्याच जोडप्यांची इथे लग्न लावल्याचा इतिहास आहे.

‘अशी’ सुरु झाली प्रेम विवाहाची प्रथा

संपूर्ण गुजरात हादरवणाऱ्या भूकंपानंतर सर्व न्यायालये अहमदाबादच्या मेघाणीनगर परिसरात हलवली गेली. त्याकाळी इथे हनुमंताचे छोटेसे मंदिर होते. हनुमंताच्या शरणात आलेल्या वकिलांनी कोर्टात अर्ज करून या मंदिरात लग्नासाठी परवानगी घेतली. तेव्हापासून जय श्री दादा हनुमान चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ‘लगनिया हनुमान’ (Laganiya Hanuman) हे प्राचीन मंदिर लग्न करण्यासाठी प्रसिद्ध झाले. या मंदिरात न केवळ अहमदाबाद तर मुंबईसह परदेशातूनही अनेक जोडप्यांनी इथे येऊन लग्न केली आहेत.

प्रेमींसाठी २४ तास खुले आहेत मंदिराचे द्वार

ज्या कोर्टाने इथे लग्न लावण्यासाठी परवानगी दिली ते न्यायालय कालांतराने दुसरीकडे हलवण्यात आले. मात्र या मंदिरात लग्न करण्याची तेव्हा सुरु झालेली प्रथा आजही सुरू आहे. मुख्य म्हणजे, प्रेमी जोडप्यांसाठी या मंदिराचे दार कधीच बंद होत नाहीत. कधीही आणि कोणत्याही वेळी प्रेमी जोडपी या मंदिरात येऊ शकतात आणि लग्न करू शकतात.

इथे जाती- धर्मात होत नाही भेदभाव

‘लगनिया हनुमान’ मंदिरात गेल्या बऱ्याच काळापासून अनेक जोडप्यांची लग्न लावण्यात आली आहेत. यातील काही जोडपी हिंदू तर काही मुस्लिमदेखील होती. जगभरातील हे असे मंदिर आहे जिथे कोणत्याही जातीच्या धर्माच्या लोकांसोबत भेदभाव केला जात नाही. इथे फक्त प्रेम हा एकच धर्म आणि एकच जात मानली जाते. (Laganiya Hanuman) या मंदिरात जात किंवा धर्माच्या आधारे कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसल्यामुळे वेगवेगळ्या जातीचे विवाह सोहळे या मंदिरात होतात.

आतापर्यंत १५००० हून अधिक जोडप्यांना मिळालाय हनुमंताचा आशीर्वाद

अहमदाबादच्या ‘लगनिया हनुमान’ मंदिराचे महंत हिराभाई जगुजी यांनी एका माध्यमाला माहिती देताना सांगितले की, २००४ मध्ये पासून आतापर्यंत या मंदिरात १५,००० हून अधिक जोडपी विवाहबंधनात अडकली आहेत. यामध्ये काही दिग्गज आणि नेतेमंडळींच्या मुलांचा देखील समावेश आहे. या मंदिरात झालेली लग्न यशस्वी होतात. कारण, इथे लग्न करणाऱ्या जोडप्याच्या प्रेम विवाहाची जबाबदारी स्वतः हनुमानजी घेतात.

विवाहापूर्वी भरावा लागतो १ फॉर्म

या मंदिरात बहुतेक प्रेमी जोडप्यांची लग्न होतात. त्यामुळे इथे लग्नासाठी येणाऱ्या जोडप्याकडून लग्नापूर्वी १ फॉर्म भरून घेतला जातो. या फॉर्ममध्ये जोडप्याचे वय प्रमाणपत्र, ओळखपत्र, हयातीचा दाखला, २ साक्षीदार आणि त्यांचे ओळखपत्र अशी कागदपत्रे जोडली जातात. (Laganiya Hanuman) हा फॉर्म कार्यालयात जमा करून रजिस्टर बुकमध्ये सह्या घेतल्या जातात. असाच एक एनआरआय फॉर्म परदेशी जोडप्यांकडूनदेखल भरून घेतला जातो. अधिकृतपणे विवाह सोहळा पार पडल्यानंतर संस्थेकडून जोडप्यांना विवाह प्रमाणपत्र प्रदान केले जाते.