हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Lake Of Skeletons) आपल्यापैकी अनेक लोकांना रहस्य, भुताटकी, गूढ अशा प्रकारच्या कथांमध्ये प्रचंड रस असतो. त्यामुळे अशी लोक जगभरात विविध ठिकाणी अद्भुत, अद्वितीय आणि डोळ्याला दिसूनही न पटणाऱ्या गोष्टींचा शोध घेत असतात. अशा अनेक घटना, वास्तू आपल्याला पहायला मिळतात. ज्या डोळ्यासमोर असूनही असू नये असं वाटतं.
आपल्या भारतातही अशा अनेक रहस्यमय गोष्टी आहेत. ज्याबाबत विज्ञानाने शोध घेण्याचा प्रचंड प्रयत्न केला आहे. मात्र अद्याप ठोस असे पुरावे आजही अनेक वैज्ञानिकांना सापडलेले नाही. यांपैकी एक रहस्य उत्तराखंडमध्ये दडले आहे. (Lake Of Skeletons) उत्तराखंड येथील लेक ऑफ स्केलेटन अर्थात मानवी हाडांचा तलाव आजही एक विचित्र मात्र अविश्वसनीय सत्य आहे. चला तर जाणून घेऊ या विचित्र तलावाचे रहस्य.
लेक ऑफ स्केलेटन (मानवी हाडांचा तलाव)
आपल्या भारतातील उत्तराखंड या ठिकाणी एक असे सरोवर आहे ज्यामध्ये अनेक सांगाडे सापडले आहेत. उत्तराखंड हे थंड ठिकाण असून समुद्रसपाटीपासून १६५०० फूट उंचीवर आहे. त्यामुळे हा तलाव वर्षभर संपूर्ण बर्फाने गोठलेला दिसतो. मात्र वेगवेगळ्या ऋतूनुसार तो लहान मोठा देखील होतो. (Lake Of Skeletons) असे असताना उन्हाळ्याच्या दिवसात जसजशी गरमी वाढते तसतसा या तलावातील बर्फ वितळू लागतो आणि यातील मानवी सांगाडे दिसू लागतात. हिवाळ्यात मात्र बर्फामुळे हे सांगाडे दिसत नाही.
बर्फात गाडलेले मानवी सांगाडे
एका वृत्तानुसार, २०२१ च्या अहवालात ६०० ते ८०० लोकांचे सांगाडे या तलावात सापडल्याचे नमूद करण्यात आले आहे. यातील काही सांगाडे पूर्ण हाडाचे तर काहींच्या अंगावर मांस असल्याचे दिसते. बर्फात गाडले गेल्याने हे सांगाडे केवळ बर्फ वितळल्यानंतर दिसून येतात. (Lake Of Skeletons) येथील सरकार मात्र या तलावाचे वर्णन ‘रहस्यमय तलाव’ असे करते. या तलावाविषयी अद्यापही अनेक लोकांना काहीच कल्पना नाही. वृत्तानुसार १९४२ मध्ये ब्रिटिश रेजर्सना या तलावात पहिल्यांदा सांगाडा दिसला होता आणि तेव्हापासून या तलावामध्ये सांगाडे दिसत आहेत. मात्र, आजपर्यंत या तलावात दिसणाऱ्या सांगाड्यांचे रहस्य वैज्ञानिकही उलगडू शकलेले नाहीत.
हजारो वर्षांपूर्वीचे रहस्यमयी तलाव (Lake Of Skeletons)
उत्तराखंडमधील ‘लेक ऑफ स्केलेटन’ या तलावाबाबत अनेकांनी अनेक तर्क लावले आहेत. तर अनेक शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिकदेखील या तलावाचे नेमके रहस्य काय आहे? हे उलगडण्याचा प्रयत्न अजूनही करत आहेत. या तलावात सापडलेल्या अस्थींबाबत विविध अफवा आणि कथा प्रचलित आहेत. मात्र नेमकं सत्य काय आहे? हे कुणालाही ठाऊक नाही. येथील स्थायिकांच्या मते २००४ साली शास्त्रज्ञांनी कार्बन डेटिंगवरून या तलावात हजार वर्षांपेक्षा जास्त जुन्या लोकांची हाडे असल्याचे शोधून काढले होते. शिवाय काही हाडे १०० वर्षे जुनी असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
इतकंच काय तर हाडे आणि सांगाडे एकाच वेळी मरण पावलेले नाहीत असेही या अभ्यासात नमूद केले आहे. एका शास्त्रज्ञाने केलेल्या अभ्यासानुसार या तलावात आढळणाऱ्या सांगाड्यांचा एकाच अपघातात मृत्यू झालेला नाही. उलट वेगवेगळ्या पद्धतीने किंवा अपघाताने या लोकांचा जीव गेल्याचा दावा या अभ्यासात करण्यात आला आहे. (Lake Of Skeletons) याशिवाय काही लोक असेही सांगतात की भारत – चीन युद्धात मारल्या गेलेल्या चिनी सैनिकांचे सांगाडे या तलावात तरंगत आहेत. मात्र अजूनही या तलावात दिसणारे हे मानवी सांगाडे नेमके कोणाचे आहेत? किती वर्ष जुने आहेत? आणि कुणी टाकले? यातील कोणत्याही प्रश्नाचे ठोस उत्तर किंवा पुरावे अद्याप कुणाकडेही नाही.