Lakshadweep Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच लक्षद्वीपच्या सफरचे काही फोटो सोशल मिडीयावर शेअर केले होते. त्यानंतर मालदिवच्या काही मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. नंतर x वर बायकाॅट मालदीवचा ट्रेंड आला होता. या सर्व गदारोळात लक्षद्वीप नेमके कसे आहे ? तेथील निसर्गरम्य स्थळांची आणि लक्षद्वीपला ट्रीपला जाण्यासाठी किती खर्च येऊ शकतो, अशी चर्चा सुरु झाली आहे. तर जाणून घेऊया लक्षद्वीपमधील ट्रीपबद्दल…
लक्षद्वीपसाठी किती रुपये खर्च येईल – Lakshadweep Tour
लक्षद्वीप हा 36 बेटांचा एक द्वीपसमूह असून भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे.याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आणि पूर्वेला लक्षादिव समुद्र आहे. भारताच्या मलबार किनार्यापासून 200 ते 440 किमी (120 ते 270 मैल) अंतरावर लक्षद्वीप आहे. लक्षद्वीपला जाण्यासाठी विमान किंवा पॅसेंजर क्रूझद्वारे जाता येते. इथे जाण्यासाठी दिल्ली वा मुंबईहून निघाले तर कोची (केरळ ) येथे जाऊ शकता. विमानाने साधारण 7 ते 10 हजार रुपये खर्च (Lakshadweep Tour) येतो. कोची येथून तुम्ही लक्षद्वीपला विमानाने जाऊ शकता. या प्रवासासाठी 5 ते 6 हजार रुपयांच्या दरम्यान खर्च येतो. लक्षद्वीपचे क्षेत्रफळ अंदाजे 32 चौरस किमी (12 चौरस मैल) आहे. कावरत्ती ही लक्षद्वीपची राजधानी आहे. एकूण 36 बेटांपैकी 10 बेटांवर वस्ती आहे. ही बेटे लक्षद्वीप-मालदीव-चागोस बेटांच्या समूहाच्या उत्तरेकडील आहेत. 1799 नंतर लक्षद्वीपचा बहुतेक प्रदेश ब्रिटिशांच्या ताब्यात गेला आणि 1956 मध्ये केंद्रशासित प्रदेशाची स्थापना झाली.
लक्षद्वीपमध्ये नेमकं काय काय आहे ?
लक्षद्वीपमध्ये बहुतेक लोक जेसेरी बोलतात आणि धिवेही ही मिनिकॉय बेटावर सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. आगत्ती बेटावरील विमानतळाद्वारे बेटांना सेवा दिली जाते. मासेमारी आणि नारळाची शेती हा लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. लक्षद्वीप समूहातील सर्वात जुनी वस्ती असलेली बेटे अमिनी, कल्पेनी, आंद्रोट, कावरत्ती आणि अगट्टी आहेत. सर्व पर्यटक या बेटांवर फिरण्याची मजा घेतात. सुंदर समुद्रकिनारा आणि निसर्गरम्य स्थळ म्हणून पर्यटक लक्षद्वीपला प्राधान्य देतात.
लक्षद्वीपमध्ये पांढरे वालुकामय किनारे, विपुल निसर्गरम्य स्थळे आणि शांत परिसर आहे. त्यामुळे पर्यटक या स्थळाला जास्त पसंती देतात. लक्षद्वीप हे निसर्गसौंदर्याने नटलेले आहे आणि सुंदर समुद्र किनारे असल्यामुळे हे कौटुंबिक तसेच हनिमूनिंग डेस्टिनेशन बनले आहे. या बेटांवर जगभरातील पर्यटक भेट देतात. लक्षद्वीपला भेट देण्याचा (Lakshadweep Tour) सर्वोत्तम वेळ म्हणजे सप्टेंबर आणि मे महिना होय. या दिवसांत हवामान आनंददायी आणि जलक्रीडा करण्यासाठी अनुकूल असते. येथील तापमान 22°C ते 36°C दरम्यान राहते. पर्यटक इथे आल्यावर सर्फिंग, पोहणे, कॅनोइंग, स्नॉर्कलिंग, स्कूबा डायव्हिंग, वॉटर स्कीइंग, कयाकिंग इत्यादी खेळ खेळू शकतात. उन्हाळ्याच्या महिन्यांनंतर, जून ते ऑगस्ट दरम्यान मान्सूनचा पाऊस असतो. लक्षद्वीपमधील पीक सीझन डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत असतो.