औरंगाबाद – एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागातील म्हणजेच जिल्ह्यातील आठ आगारांत पैकी सात आगारातून काल दिवसभरात तब्बल 101 बस गाड्या धावल्या. केवळ सिल्लोड आगारातून दिवसभरात एकही बस बाहेर पडली नाही. त्याच बरोबर कामावर हजर झालेल्या चालक वाहकांची संख्याही वाढली आहे. काल दिवसभरात 104 चालक आणि 57 वाहक कामावर हजर झाले. काल जिल्ह्यात एकूण 642 कर्मचारी कामावर हजर होते.
एसटी कर्मचारी संघटनेने संप मागे घेतला आहे. परंतु त्या संघटनेशी काहीही संबंध नाही. आम्ही संपात नाही, तर दुखवट्यात आहोत. कारण विलीनीकरणाच्या मागणीसाठी 54 पेक्षा अधिक कामगारांनी प्राणांची आहुती दिली आहे. त्यामुळे मानसिक स्थिती ठीक नसल्याने कामावर जाण्याची मानसिकता नसल्याचे निवेदन एसटी कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहे. न्यायालयात 5 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत दुखवटा कायम ठेवणार असल्याचे कर्मचार्यां तर्फे सांगण्यात आले आहे.
दिवसभरात 101 बस रस्त्यावर –
डॉक्टर औरंगाबाद विभागातील औरंगाबाद मध्यवर्ती, सिडको बस स्थानकासह, पैठण, वैजापूर, कन्नड, गंगापूर आणि सोयगाव आगारातून काल सायंकाळी सहा वाजेपर्यंत 101 बस गाड्यांनी तब्बल 246 फेऱ्या केल्या होत्या. जालना, बीड, मंठा, पुणे, नाशिक, बुलढाणा, जळगाव, धुळे, चाळीसगावसह ग्रामीण भागात दिवसभरात 3058 प्रवाशांनी प्रवास केला. जिल्ह्यातील केवळ सिल्लोड आगारातून मात्र, एकही बस घावली नाही.