Friday, June 2, 2023

मुख्यमंत्री ठाकरे एकदा राज्यभर फिरा म्हणजे रस्त्याचे भाग्य उजळेल – संदीप देशपांडे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईत विधिमंडळाच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थितीवरून विरोधक व सत्ताधारी यांच्यात टोलेबाजी झाले. दरम्यान आज मनसेचे ने संदीप देशपांडे यांनी त्यांना टोला लगावला आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळ अधिवेशनाला जाणार म्हणून वर्षा ते विधिमंडळ रस्ते गुळगुळीत केले आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी राज्यभर प्रवास करावा. म्हणजे रस्त्यांचे भाग्य उजळेल आणि येथील रस्त्यांचीही डागडुजी करण्यात येईल,” असा टोला देशपांडेंनी लगावला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्याची अधिवेशनास गैरहजेरी आणि रस्त्यावरील पडलेले खड्डे यावरून निशाणा साधला.

यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळ अधिवेशनाला जाणार म्हणून सरबराई सुरू आहे. त्यासाठी वर्षा ते विधिमंडळ पर्यंतचे रस्ते गुळगुळीत करण्यात आले आहेत. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असाच प्रवास राज्यभर करावा. त्यामुळे त्या ठिकाणी असलेले रस्तेही गुळगुळीत होतील. लोकांच्या अडचणी मिटतील यात शंका नाही.

सध्या राज्यभर फिरल्यास दिसेल कि राज्यातील रस्त्याची अवस्था काय झालेली आहे. राज्यात कोकण, विदर्भ, मुंबईत तर अनेक ठिकाणी रस्ते खराब झालेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या रस्त्यांवरूनही प्रवास करावा. त्यांच्या अशा दौऱ्यांमुळे या भागातील रस्त्यांचे भाग्य उजळेल आणि येथील रस्त्यांचीही डागडुजी करण्यात येईल.