कोरची | बिरसा मुंडाच्या विचारांना जिवंत ठेवण्यासाठी ग्रामसभेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांनी जल, जंगल, जमीन वाचविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ग्रामसभेचे जिल्हा परिषद सदस्य अॅड. लालसु नोगोटी हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. पुढे बोलताना नोगोटी म्हणाले की, राजकीय पक्षांनी आदिवासी लोकांना पोपट बनवून ठेवला आहे. राजकीय पक्षाचे पुढारी जसे सांगतात तसे वागन्याची सवय आपल्याला झाली आहे. या मधून बाहेर पडलो पाहीजे नाही तर या देशातील जनतेवरील अन्याय थांबणार नाही. सरकार पुंजीपतीना हाताशी घेऊन विकासाच्या नावावर लोकांचे विस्थापन करत आहे. जनतेची फसवणूक करत आहे. जगात खदानीमुळे कुठेही विकास झाला नाही. खदानींमुळे विनाशच झाला आहे. त्यामुळे आताच सतर्क होऊन अन्यायाच्या विरोधात संघर्ष तीव्र करण्याची आवश्याकता आहे. आदिवासींची जमीन हड़पली जात आहे. देशात सर्वात जास्त आदिवासीच विस्थापित झाले. जेलमध्ये अदिवासींचीच संख्या सर्वात जास्त आहे. देशात भाषावार प्रांतरचना झाली असतांना. मध्य भारतात गोंडी बोलणाऱ्या लोकांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र गोंड़वाना राज्य निर्माण करण्यात आला नाही. उलट त्यांना वेगवेगळ्या राज्यात विभागून त्यांना त्या त्या राज्यात अल्पसंख्यात आणले. या देशात संस्कृत बोलणाऱ्यांपेक्षा गोंडी बोलणारे जास्त आहेत. पन जनुनबुजुन गोंडी भाषेला राज्यघटनेच्या 8 व्या अनुसूचित समावेश केले नाही. त्यामुळे आज बिरसा मुंडा, वीर बाबूराव शेडमाके यांच्या इतिहास पाठ्यक्रमात नाही. आदिवासी संस्कृती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जगातील सर्वात प्राचीन अशी गोटूल संस्थाही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आदिवासींना हिन्दू ठरविले जात आहे. जे की ते नाहीत. आज या देशातील आदिवासींच्या हातातून सर्वच हिसकावून घेऊन जात आहेत. त्यांच्या भाषा, धर्म, संस्कृतीवर गदा येत आहे. आज ते ज्या जमिनीवर उभे आहेत, ते जमीनही त्यांच्या पायाखालून सरकत आहे. ग्रामसभांचा विरोध असतांना, ग्रामसभेच्या संमतीशिवाय पूंजीपती, भांड़वालशाही कंपनींच्या हातात जमीन देऊन मूठभर लोकांचे पोट भरले जात आहे. जनतेचा रोजगार नष्ट केले जात आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामसभा एकत्र यावे असे आवाहन एड. लालसू नोगोटी यानी केले.
मौजा दोडके तालुका कोरची येथे तालुकास्तरीय बिरसा मुंडा जयंती उत्सव कार्यक्रम व समाजप्रबोधन कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमात 30 गावातील लोक उपस्थित झाले होते. या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून मा. दौलतजी मडावी पोलीस पाटील जामनारा हे उपस्थित होते. तर उद्घाटक म्हणून मा.हरसींगजी कमरो व सुंदरजी नैताम गावपुंजारी व मोहन कुंमरे, शियाराम हलामी, अंताराम काटेंगे, दुलाराम बोगा पो पा भुर्यालदंड, हिरालाल राऊत, संजू साखरे, रामू होळी, इजामसाय काटेंगे, झाडूराम हलामी, कल्लो सर आस्वलहुडकी, बोगा सर कोचिनारा, तसेच समस्त गावकरी व 30 गाव सर्कलचे समस्त आदिवासी समाज यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. मार्गदर्शक म्हणून रमेशजी कोरचा सर, लालसूजी नोगोटी, अनिलजी केराची जि.प.सदस्य, गडचिरोली, रामसुराम काटेंगे, नंदू वैरागडे पत्रकार कोरची यासर्वानी मार्गदर्शननात बिरसा मुंडा यांचा जिवन परिचयावर तसेच शिक्षण, संस्कृती व जल जंगल जमिन यामुद्दावर अधिक भर टाकून उपस्थित जनतेला मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे शिका, संघटीत व्हा, संघर्ष करत रहा व असाच पध्दतीने प्रत्येक गावा गावात कार्यक्रम घेऊन समाजाला जागृत करावी. असे सर्वानी आपल्या विचारात व्यक्त केले. सूत्रसंचालन बाबुराव मडावी तर आभारप्रदर्शन शितल नैताम यानी केली. अशाप्रकारे मोठा थाटामाटात कार्यक्रम साजरा करण्यात आला.यावेडी दोडके ग्रामसभेच्या उत्पादनातून जिल्हा परिषद शाळेत शिकत असलेल्या मुलांना बॅग वितरण करण्यात आले.