सांगली प्रतिनिधी । जत तालुक्यातील जालीहाळ बुद्रुक येथे शेतजमिनीचा वादातून पुतण्यानीच चुलत्याचा दगडांनी ठेचून खून केल्याची खळबळ घटना आज उघडकीस आली आहे. या घटनेतील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महादेव पुजारी असे खून झालेल्या व्यक्तीच नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि मयत महादेव पुजारी, आरोपी सिलीशिधद पुजारी आणि प्रभूलिंग पुजारी यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून शेतजमिनीचा वाद सुरू होता. या वादातून त्यांची अनेकवेळा मारहाण झाली होती. या मारहाणीचे पोलीसात गुन्हे ही दाखल आहेत. तसेच याची कोर्टात केसही चालू आहे. यातील मयत महादेव पुजारी हा कोर्टात तारखेला आलेला असताना तो जालीहाळ बुद्रुक येथे आईला भेटायला आला होता. त्यावेळी पुतण्याने हीच संधी साधून यातील आरोपी सिलीशिधद पुजारी व प्रभूलिंग पुजारी यांनी त्याला जबरदस्तीने मोटायसायकवर बसवून घेऊन गेले. याबाबत अपहरण केल्याची तक्रार ३ डिसेंबर रोजी उमदी पोलिसात दाखल केली होती.
त्यानुसार उमदी पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपी यांना अटक केली. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी खून केल्याची कबुली दिली आहे. यातील मयतास लवंगा रस्त्यावरील मरीयाई मंदिराच्या आवारातील आरोपींच्या शेतात घेऊन जाऊन मयताच्या डोक्यात दगडाने ठेचून ठार मारले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत पोत्यात घालून गावाच्या शेजारी असलेल्या ओढापात्रातील विहिरीत दगड बांधून टाकून दिल्याची कबुली दिली आहे.