डेळेवाडी खिंडीत दरड कोसळली, रस्ता बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | ढेबेवाडी आणि पाटण रोडला जोडणाऱ्या कोळेवाडी- तांबवे या मार्गावरील डेळेवाडी खिंडीत दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला आहे. ढेबेवाडी मार्गावरील अनेक गावांना मल्हारपेठ, उंब्रज, सुपने- तांबवे तसेच सातारा येथे जाण्यासाठी हा मार्ग सोमवार दि. 11 रोजी सकाळपासून बंद झाला आहे. त्यामुळे आता पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड- ढेबेवाडी या मार्गावरील कोळे, कुसूर, तळमावले यासह उंडाळे भागातील अनेक गावातील लोक डेळेवाडी खिंडीचा वाहतूकीस वापर करतात. परंतु या खिंडित दरड कोसळली आहे. पूर्ण रस्त्यावर माती, दगड पसरलेले आहेत. सोमवारी पहाटे दरड कोसळली. सकाळी अनेकजण या खिंडीतून कामावर तसेच ये- जा करण्यासाठी वापर करतात. मात्र, दरड कोसळल्याने पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला.

कराड तालुक्यातील तांबवे विभागातील डेळेवाडी – आंबवडे या गावाच्या दरम्यान ही दरड कोसळली आहे. पावसाळ्यात अनेकवेळा येथे दरड कोसळते, त्यामुळे लोकांचा मोठी गैरसोय होत असते. तेव्हा बांधकाम विभागाने लवकरात लवकर दरड हटविण्याची मागणी स्थानिकांच्याकडून केली जावू लागली आहे.