सातारा । महाबळेश्वर धामणेर रस्त्याचे ३१० कोटी रुपायाचे काम सुरु आहे. यामधील महाबळेश्वर ते केळघर रस्त्याच्या दरम्यान काळकडा ते रेंगडी गावापर्यतचा भुगर्भ सर्वे आय आय टी पवईच्या शास्त्रज्ञानी २०१८ साली केला होता. सर्वे केल्यानंतर काळाकडा ते रेंगडी गावादरम्यान मार्गदर्शक व धोका टाळण्याकरीता उपाययोजना करण्याकरीता बहुमोल सुचना आय आय टी पवईच्या भुगर्भ शास्त्रज्ञाच्या अहवालात देण्यात आल्या होत्या. दरम्यान, काळाकडा ते रेंगडी सर्वेची भुगर्भ शास्त्रज्ञाची प्रत माहितीच्या अधिकारात मागितली असताना, अहवाल अद्याप देण्यात न आल्याने अहवाल गहाळ झाला का ? अशी संशयाची सुई सार्वजनिक बाधकाम विभागाच्या अभियंत्यांकडे इशारा करत आहे.
महाबळेश्वर ते धामणेर रस्त्याच्या बांधकामात नियमांना व गुणवत्तेला फाटा देण्यात आला आहे. सर्वसामान्यांननी माहीती मागितली असता माहीती देणे टाळण्याचा उद्योग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियत्याकडून केला जात आहे. महाबळेश्वर ते धामणेर रस्त्याच्या गुणवत्तेची जबाबदारी शासनाच्या अभियंत्यांची आहे. मात्र ३१० कोटींच्या निविदेमध्ये गुणवत्ता ठेवण्याकरीता खाजगी “इनडिपेन्डन्ट इजिनिअर “ कंपनीला काम देण्यात आले आहे. परंतु खाजगी कंपनीने केलेल्या कामाची गुणवत्ता केवळ कागदोपत्री असून प्रत्यक्षात मात्र कामाचा दर्जा निकृष्ट आहे .
जावलीचे उपअभियंता रस्ते कामात हालगर्जी करताना दिसत आहे. महाबळेश्वर धामणेर रस्त्यामध्ये झाडाचा प्रश्न भिजत घोगड होऊन पडला आहे. मात्र रस्त्याचे बाधकाम रोड वे सोल्युशन इंडीया कपनी म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग जावली तालुक्याच्या नाका पेक्षा मोती जड झाली असल्याचे चित्र दिसू लागले आहे .
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.