जन धन खाते आधारशी लिंक न केल्यास होईल मोठे नुकसान; ‘अशा’ प्रकारे करा लिंक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जन धन खातेधारकांनी आपले खाते आपल्या आधार कार्डशी लिंक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसे न केल्यास ग्राहकांना मिळणाऱ्या अनेक सुविधा बंद केल्या जातील. जन धन खाते हे झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट आहे. याशिवाय यात ओव्हरड्राफ्ट आणि रुपे कार्डसह अनेक विशेष सुविधा उपलब्ध आहेत.

जन धन खातेधारकाला रुपे डेबिट कार्ड दिले जाते, ज्यामध्ये 1 लाख रुपयांचा ऍक्सिडेंटल इन्शुरन्स देखील उपलब्ध आहे. जर खातेदाराने खाते आधारशी लिंक केले नाही तर त्याला हा लाभ मिळू शकणार नाही. याशिवाय, खातेधारकाला या खात्यावर 30000 रुपयांचे ऍक्सिडेंटल देठ इन्शुरन्स कव्हर देखील मिळते. मात्र हे देखील तेव्हाच उपलब्ध होते जेव्हा आधार बँक खात्याशी लिंक केले जाते. याशिवाय खातेदाराला सामान्य इन्शुरन्स कव्हरची सुविधाही मिळते. मात्र, या सर्व फायद्यांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमचे जन धन खाते आधारशी लिंक करावे लागेल.

अशा प्रकारे जन धन खाते आधारशी लिंक करा
जन धन खाते आधारशी लिंक करण्यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागेल.
तुम्हाला आधार कार्डची फोटो कॉपी आणि बँक पास बुकची कॉपी सोबत ठेवावी लागेल.
बँकेत जाऊन फॉर्म भरावा लागेल. यानंतर तुमचे जन धन खाते आधारशी लिंक केले जाईल.
SBI सह अनेक बँका केवळ मेसेजद्वारे ग्राहकांना आधार लिंक करण्याची सुविधा देत आहेत.
यासाठी, तुम्ही तुमच्या आधारच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून 567676 या क्रमांकावर मेसेजमध्ये UID<SPACE>आधार क्रमांक<SPACE>खाते क्रमांक पाठवू शकता.
अशा प्रकारे तुमचे खाते आधारशी सहजपणे लिंक केले जाईल.
याशिवाय तुम्ही बँकेच्या ATM शी आधार लिंकही करू शकता.

Leave a Comment