IPL मधल्या यशानंतर Lasith Malinga ला मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी

Lasith Malinga
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – जगातला दिग्गज फास्ट बॉलर आणि यॉर्कर किंग म्हणून लोकप्रिय असलेल्या लसिथ मलिंगाला (Lasith Malinga) श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने मोठी जबाबदारी दिली आहे. पुढच्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मर्यादित ओव्हरच्या सीरिजसाठी मलिंगाला (Lasith Malinga) श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने स्ट्रॅटजी कोच बनवले आहे. श्रीलंकन बॉलिंगला धार देणं तसंच रणनिती ठरवणं आणि बॉलरचं तंत्र आणखी मजबूत करणं, ही जबाबदारी मलिंगावर (Lasith Malinga) असणार आहे. लसिथ मलिंगाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कोचिंगला सुरूवात केली.

नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्सचा बॉलिंग कोच म्हणून काम करत होता. मलिंगाच्या कोचिंगचा राजस्थानला चांगला फायदा झाला. 2008 नंतर पहिल्यांदाच राजस्थानची टीम आयपीएल फायनलमध्ये पोहोचली, पण फायनलमध्ये गुजरातकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर आता मलिंगा (Lasith Malinga) श्रीलंकेच्या बॉलरना मदत करणार आहे. याअगोदर मलिंगा आयपीएलमध्ये मध्ये मुंबई इंडियन्सचा भाग होता. मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवण्यात त्याचा मोलाचा वाटा होता.

श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 टी-20 आणि 5 वनडे मॅचची सीरिज होणार आहे. 7 जूनपासून कोलंबोमध्ये या सीरिजला सुरूवात होणार आहे. यानंतर 2 टेस्ट मॅचची सीरिजसुद्धा खेळवण्यात येणार आहे. पहिली टेस्ट तर दुसरी आणि शेवटची टेस्ट 8 जुलै रोजी होणार आहे. याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात टी-20 सीरिजसाठी श्रीलंकेची टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेली होती, तेव्हाही मलिंगा (Lasith Malinga) श्रीलंकेचा बॉलिंग कोच होता. मात्र या सिरीजमध्ये श्रीलंकेचा 1-4 ने पराभव झाला होता.

हे पण वाचा :
‘या’ penny stocks ने गुंतवणूकदारांना एका वर्षात दिला 6,000 टक्के नफा !!!

मोहाडीत मालवाहतूक गाडी ट्रकची धडक, ट्रॅव्हल्समधीत 3 जण गंभीर जखमी

‘या’ सरकारी बँकेने वाढवले आपल्या ​​FD चे व्याजदर !!!

तीन पक्षांचे सरकार त्यामुळे भांड्याला भांडं लागतंच, राष्ट्रवादीची मते शिवसेनेला देणार ; अजित पवारांचे महत्वाचे विधान

पळपुट्यांनी आमच्याकडे दुर्बिणी लावू नये; संजय राऊतांची दानवेंवर टीका