प्रीतिसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त अभिवादन

0
119
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

भारताचे माजी उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे पाहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्या जयंतीनिमित्त कराड येथील प्रीतिसंगमावरील त्यांच्या समाधीस्थळी राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल व सातारचे खा. श्रीनिवास पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी नामदार बाळासाहेब पाटील म्हणाले की, यशवंतराव चव्हाणसाहेबांची जयंती आज राज्यात साजरी होत आहे, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी खूप त्याग केला.स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाजकरणामध्ये काम करत असताना महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले. राज्याची निर्मिती झाल्यानंतर हा महाराष्ट्र पुरोगामी विचाराने पुढे गेला पाहिजे, याला आधुनिकतेची कास असली पाहिजे आणि त्याचबरोबर या राज्यात पिकणाऱ्या मालावर प्रक्रिया करणारी कारखानदारी उभी राहिली पाहिजे यासाठी त्यांनी फार मोठे योगदान दिले.आणि त्याच्या विचाराने आज महाराष्ट्र राज्याची वाटचाल सुरू आहे. सर्वसामान्य जनतेला आपलंसं वाटणाऱ्या नेतृत्वाची आज जयंती, त्यानिमित्त जिल्ह्यातील जनतेच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन केले.

दरम्यान यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथून आलेल्या यशवंत ज्योतीचे स्वागत नामदार बाळासाहेब पाटील खासदार श्रीनिवास पाटील व मान्यवरांनी केले. याप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील,  राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माहिती व तंत्रज्ञान सेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सारंग पाटील, कराड नगरपरिषदेचे विरोधीपक्षनेते सौरभ पाटील, डॉ.अशोकराव गुजर, ॲड.मानसिंगराव पाटील,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार, कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, कराड नगरपरिषदेचे आजी माजी नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आजी माजी सदस्य तसचे सह्याद्रि सहकारी साखर कारखन्याचे आजी माजी संचालक व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here