आमच्या राष्ट्रावर नियंत्रण ठेवणारे फॅसिस्ट आपल्या शूर विद्यार्थ्यांच्या आवाजाला घाबरतात – राहुल गांधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दिल्ली | जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी रात्री झालेल्या हिंसाचाराबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. आमच्या राष्ट्रावर नियंत्रण ठेवणारे फॅसिस्ट आपल्या शूर विद्यार्थ्यांच्या आवाजाला घाबरतात असंच आजच्या जेएनयू वरील हल्ल्यावरुन दिसत आहे असे राहुल यांनी म्हटले आहे.

मुखवटा घातलेल्या गुंडांनी जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर पाशवी हल्ला केल्याने अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. आमच्या राष्ट्रावर नियंत्रण ठेवणारे फॅसिस्ट आपल्या शूर विद्यार्थ्यांच्या आवाजाला घाबरतात. आजची जेएनयूमधील हिंसा ही त्या भीतीचे प्रतिबिंब आहे असा दावा राहुल यांनी आपल्या ट्विट मध्ये केला आहे.

https://twitter.com/RahulGandhi/status/1213850414258380807

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी रात्री लाठी घेऊन सशस्त्र मुखवटा असलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला केला आणि कॅम्पसमधील मालमत्तेचे नुकसान केले. या हल्ल्यात किमान 18 जण जखमी झाले आणि त्यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले आहे. जेएनयू विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आयशे घोष यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. डाव्या नियंत्रित जेएनयूएसयू आणि एबीव्हीपीने सुमारे दोन तास सुरू असलेल्या हिंसाचारासाठी एकमेकांना दोष दिले.

Leave a Comment