सर्वसामान्यांची ताकत शिवसेनेचा भगवा पालिकेवर फडकणार – यशवंत घाडगे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

महाबळेश्वर प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

महाबळेश्वर येथे पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर पक्षाची महत्वपूर्ण जवाबदारी शिवसेनेने महाबळेश्वरमध्ये देऊन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्काच्या व्यासपीठाला सेनापती दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी शिवसेनेच लोकाभिमुख काम राज्याच्या कोपऱ्यापर्यंत पोहचवत आहेत. सर्वसामान्याची ताकत शिवसेनेचा भगवा महाबळेश्वर नगरपालिकेवर फडकवणार असल्याचा विश्वास'” शिवसेना जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे यांनी येथे व्यक्त केला.

यावेळी राजेश कुंभारदरे म्हणाले की, आगामी पालिका निवडणुक पुर्ण ताकतीने लढविली पाहिजे. यासाठी एकत्र येताना आपापसातील मतभेद बाजुला ठेवुन एकत्र आले पाहीजे. पालिके संदर्भातील निवडणुका बाबत सर्वांना विश्वासात घेऊनच धोरणात्मक निर्णय घेतला जावा. कोणी एका पदाधिकारी व नेत्याने परस्पर पालिका निवडणुका संदर्भात निर्णय घेऊ नये. तालुुक्यातील निवडी करतानाही देखील पक्षाने स्थानिक पदाधिकारी यांना विचारात घेऊनच निवडी जाहीर कराव्यात, अशी अपेक्षाही कुंभारदरे यांनी व्यक्त केली.

पक्ष वाढविण्यासाठी निष्ठावान कार्यकर्त्यांनी नव्या शिवसैनिकांना पक्षाच्या प्रवाहात सहभागी करून घेतले पाहिजे. शिवसेना पादाधिकारी कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन गावाच्या विकासासाठी कामे मंजुर करून आणली पाहिजे, असे आवाहन माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनी व्यक्त केले. महाबळेश्वर येथील कार्यक्रमप्रसंगी महाबळेश्वर तालुका संपर्क प्रमुख सुरेश कदम, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, माजी जिल्हा प्रमुख राजेश कुुंभारदरे, उपजिल्हा प्रमुख अजित यादव, युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख सचिन वागदरे, संतोष जाधव, संजय शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment