हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Lava Blaze 5G : आजकाल बाजारात अनेक नवनवीन फीचर्स असलेले स्मार्टफोन लाँच केले जात आहेत. प्रत्येक स्मार्टफोन बनवणारी कंपनी आपला स्मार्टफोन हा इतर कंपन्यांपेक्षा वेगळा ठेवण्याचा प्रयत्न करतात. आताही Lava या स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनीकडून आपला नवीन Lava Blaze 5G फोन लॉन्च करण्याची घोषणा करण्यात आली आहे. Amazon या ई-कॉमर्स वेबसाइटद्वारे भारतात हा फोन विकला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
हे लक्षात घ्या कि, गेल्याच महिन्यात इंडिया मोबाइल काँग्रेस 2022 या कार्यक्रमा Lava Blaze 5G दरम्यान Lava कडून या फोनबाबत घोषणा केली गेली होती. त्यावेळी दिवाळीच्या आसपास हा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला जाईल असा अंदाज व्यक्त केला गेला होता. मात्र सणासुदीचा हंगाम संपल्यानंतरही बाजारात कुठेही हा फोन दिसून आलेला नाही.
नुकतेच कंपनीकडून 3 नोव्हेंबर रोजी भारतात Lava Blaze 5G लाँच केला जाणार असल्याची पुष्टी केली गेली आहे. हा नवीन Lava Blaze 5G ड्यू ड्रॉप स्टाइल नॉचसहीत येईल. तसेच या फोनमध्ये कंपनी 7 जीबी (3 जीबी व्हर्च्युअल) रॅम दिली जाणार आहे. याशिवाय यामध्ये एक मजबूत प्रोसेसर आणि डिस्प्ले देखील मिळेल. 5G कनेक्टिव्हिटी असलेल्या या फोनची किंमत 10 हजार रुपयांपर्यंत असणार आहे.
डिस्प्ले बाबत बोलायचे झाल्यास यामध्ये कंपनी 1600×720 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.5-इंच HD + LCD पॅनेल देत आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 90Hz असेल. तसेच या फोनमध्ये 4 GB रॅम आणि 3 GB व्हर्चुअल रॅम देखील देणार आहे. म्हणजेच या फोनची एकूण रॅम 7 जीबी असेल.
या नवीन Lava Blaze 5G मध्ये Dimensity 700 प्रोसेसरही देण्यात आला असेल. यामध्ये 128GB इंटर्नल स्टोरेज देखील आहे जे मायक्रोएसडी कार्ड स्लॉटद्वारे वाढवता देखील येईल. या फोनमध्ये प्री-इंस्टॉल Android 12 OS ही देण्यात आला आहे. तसेच यामध्ये 5,000mAh ची दीर्घकाळ टिकू शकणारी बॅटरी देखील देण्यात आली आहे.
कनेक्टिव्हिटीबाबत बोलायचे झाल्यास या फोनमध्ये ड्युअल सिम, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.1, जीपीएस, यूएसबी टाइप सी पोर्ट आणि 3.5 मिमी ऑडिओ जॅक असेल. तसेच कंपनीने हा फोन YBlue आणि Green या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच केला गेला आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.lavamobiles.com/smartphone/blaze
हे पण वाचा :
आपल्या Aadhar Card मधील माहितीचा गैरवापर टाळण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या
Multibagger Stock : सोलर सर्व्हिस पुरवणाऱ्या ‘या’ कंपनीने एका वर्षात दिला 1500% नफा !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित घसरण, आजचा भाव पहा
सर्वात स्वस्त iPhone 13 कुठे मिळत आहे ते जाणून घ्या
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् 25GB डेटा