तक्रार मागे घ्या नाहीतर…धनंजय मुंडेंची रेणू शर्माच्या कुटुंबियांना धमकी; वकिलांचा गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप असतानाच त्यांच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, रेणू शर्मा यांच्या वकिलाने धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.धनंजय मुंडे यांनी रेणूच्या भावाला आणि वहिनीला धमकी दिली आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तुझ्या बहिणीला तक्रार परत घ्यायला लाव नाहीतर तुझ्या परिवाराला खंडणीच्या गुन्ह्यात आतमध्ये टाकेल. तुम्हा लोकांना माझी पॉवर माहिती नाही अशी धमकी धनंजय मुंडे यांच्याकडून करण्यात आल्याचा मोठा आरोप रेणूच्या वकिलाकडून करण्यात आला .

रेणूच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणाला गेले 4 दिवस झाले तरी अद्याप FIR दाखल केली जात नाही. धनंजय मुंडे हे दबाव टाकत आहेत. रेणू विरुद्ध खोटे केस केले जात आहेत. माझ्या ताकदीची तुम्हाला कल्पना नाही, बहिणीला केस widraw करायला सांगा नाहीतर सगळ्या कुटुंबाला खंडणी प्रकरणात अडकवू असं धंनजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना धमकावलं असल्याचंही वकिलांनी माध्यमांसमोर सांगितलं.

दरम्यान, आज रेणु यांचं अर्धच स्टेटमेंट झालं असून उद्या 11 वाजता पुन्हा स्टेटमेंट रेकॉर्डसाठी बोलावण्यात आल्याची माहिती वकिलांकडून देण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment