रामसेतूचे वय आणि निर्माणाचे रहस्य लवकरच समोर येणार; ASI ची संशोधनास मान्यता

नवी दिल्ली | भगवान श्रीराम यांच्याशी जोडले गेलेल्या रामसेतूच्या विषयी लवकरच माहिती मिळू शकणार आहे. ‘अंडरवॉटर रिसर्च प्रोजेक्ट’साठी याच वर्षी सुरुवात होणार आहे. यामध्ये दगडांच्या मांडणीला आणि शृंखला यावर अध्ययन केले जाईल व ते कसे बनवले आहे यावर संशोधन केले जाईल. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी यांच्या वैज्ञानिकांवरती या संशोधनाची जबाबदारी सोपवली गेली आहे. वैज्ञानिकांचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञान याच्यामार्फत पुलाचे आयुष्य आणि रामायणाचा काळ याची माहिती करून घेण्यास मदत होऊ शकेल. आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (ASI) ने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

या संशोधनासाठी NIO हे सिंधू साधना नावाच्या जहाजाचा उपयोग करेल. या सिंधू साधना जहाजमधून सॅम्पल्स गोळा केले जातील. पाण्याच्या 35 ते 40 मीटर खाली राहून हे जहाज सॅम्पल गोळा करू शकते. या संशोधनामध्ये रेडिओमॅट्रिक आणि थर्मोलुमिनन्सस या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. सोबतच दगडांमध्ये असलेल्या कॅल्शियम कार्बोनेटमुळे पुलाचे वय किती आहे हे समजू शकेल.

https://t.co/dAN1K00Y9z?amp=1

रामसेतू हा 48 किलोमीटर लांब आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये समुद्रात हा पूल आढळतो कोरल आणि सिलिका या दगडांपासून हा पूल बनवलेला आहे. या पुलाला हिंदू महाकाव्य रामायणामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. काही ठिकाणी हा पूल पाण्याच्या केवळ तीन फूट खाली तर काही ठिकाणी पाण्यापासून तीस फूट खोल आहे.

https://t.co/BOiVqz00pm?amp=1

https://t.co/95TzJA5NFu?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like