टीम हॅलो महाराष्ट्र : देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी नोटांवर लक्ष्मीचे चित्र छापले पाहिजे, असा अजब सल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी सरकारला सांगितला आहे. मध्यप्रदेशच्या खंडवा जिल्ह्यात ते पत्रकारांशी बोलत होते. इंडोनेशियातील नोटांवर भगवान गणेशचा पुतळा छापल्याच्या बातमीविषयी पत्रकारांनी विचारले असता डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हंटले की, ‘मी म्हणतो की आपल्या नोटांवर देवी लक्ष्मीचे चित्र असले पाहिजे. गणपती हा विघ्नहर्ता आहे, परंतु देशाचे चलन सुधारण्यासाठी लक्ष्मीचे चित्र छापले पाहिजे आणि त्याबद्दल कोणालाही वाईट वाटले नाही पाहिजे.
ते असेही म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी लक्ष्मीजींचा फोटो नोटांवर छापण्याच्या संदर्भात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच उत्तर देऊ शकतात.
हिंदू आणि मुस्लिम यांचे डीएनए एक
ते म्हणाले की हिंदू आणि मुस्लिमांचे डीएनए एकसारखे आहेत. दोघांचे वंशजही एकसारखे आहेत. इंडोनेशियातील मुस्लिमांचा असा विश्वास आहे की आमचे वंशज एक आहेत. पण भारतातील मुस्लिम याचा का विचार करू शकले नाहीत? असा सवाल स्वामींनी केला. हे सिद्ध करण्यासाठी ते म्हणाले की, इंडोनेशियन नोटावरील गणेशजींचा फोटोदेखील याची साक्ष देतो.
त्यांनी असा दावा केला की नजीकच्या काळात आम्ही युनिफॉर्म सिव्हिल कोडही आणणार आहोत. ते म्हणाले की पंतप्रधानांनी ठरवले तर पाच मिनिटांत समान नागरी कायदा लागू होईल. घटनेच्या कलम 44 मध्ये त्याचा उल्लेख आहे. सुप्रीम कोर्टाने 70 वर्षात 10 वेळा सांगितले असेल, परंतु मागील कोणत्याही सरकारने यावर पाऊल उचलले नाही.