हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन|आल्याच्या पिकात गांजाच्या झाडांची विक्री करण्याकरीता लागवड व जोपासणा करणाऱ्या एकास एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून तब्बल २७ लाख ३४ हजार ५०० रुपयांची गांजाची झाडे जप्त केली आहेत.
लहु कुंडलिक घोरपडे (रा. खोजेवाडी, जिल्हा सातारा) असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी अंमली पदार्थाची विक्री, वाहतुक, लागवड करणारे इसमांचे विरुध्द कारवाई करणेच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिलेल्या होत्या. यानंतर पोलिस निरीक्षक, श्री. अरुण देवकर यांनी सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे व पोलीस उपनिरीक्षक, श्री. पतंग पाटील यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करुन त्यांना सातारा जिल्ह्यातील अंमली पदार्थाची विक्री, वाहतुक, लागवड करणारे इसमांची माहिती प्राप्त करुन त्यांचेवर कारवाई करणेच्या सुचना दिल्या.
दि.२६/१०/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक श्री. अरुण देवकर यांना माहिती प्राप्त झाली की, मौजे खोजेवाडी गावात राहणारा इसम लहु कुंडलिक घोरपडे याने त्याचे मानकर शिवार नावाचे शिवारातील आले पिकाचे शेतात गांजाची लागवड करुन विक्री करणेसाठी तो जोपासत आहे. त्याने अंगात गुलाबी रंगाचा शर्ट व राखाडी रंगाची पॅन्ट घातली असुन सदर इसम ६० ते ६५ वयोगटातील आहे.
अशी माहिती प्राप्त झाल्याने पोलीस निरीक्षक श्री. अरुण देवकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, व पोलीस उपनिरीक्षक श्री पतंग पाटील यांचे पथकास प्राप्त झाले माहितीचे ठिकाणी जावुन काही आक्षेपार्ह आढळुन आल्यास कावाई करणेच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे नमुद पथकांनी प्राप्त माहितीचे ठिकाणी मौजे खोजेवाडी ता. जि. सातारा गावचे हद्दीतील आले पिकाचे शेतात जावुन पाहणी केली असता नमुद शेतामध्ये गांजाची झाडांची लागवड केलयाचे आढळुन आले त्या शेतामध्ये उभ्या असलेल्या इसमास सदरचे शेत कोणाचे आहे.
याबाबत विचारणा केली असता, त्याने सदरचे शेत त्याचे स्वतःचे मालकीचे असल्याचे सांगुन तोच या लागवड केलेल्या गांजाच्या झाडांची जोपासणा करीत असल्याचे सांगीतलेने सदरची लागवड व जोपासना केलेली एकुण १८ गांजाची झाडे पथकाने गुंगीकारक औषधी द्रव्ये आणिक मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ मधील तरतुदीनुसार ताब्यात घेवुन त्याचे वजन केले असता त्याचे वजन १०९.३८० किलोग्रॅम इतके आहे.
जप्त करण्यात आलेल्या गांजाच्या झाडांची किंमत २७,३४,५००/- रु. (सत्तावीस लाख चौतीस हजार पाचशे रुपये) इतकी असुन, नमुद वर्णनाची व किंमतीची गांजाची झाडे या इसमाने त्याचे मालकीचे आल्याचे शेतात लागवड व जोपासणा केल्याचे आढळुन आला. त्याचे विरुध्द बोरगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. ४९२ / २०२३ गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८, २०, २०(अ) (ब) (ii) (क). २२ (क) अन्वये गुन्हा नोंद केला आहे.