शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? पंतप्रधान मोदींचा घणाघाती प्रहार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “महाराष्ट्रातील एक नेते अनेक वर्ष केंद्र सरकारमध्ये कृषी मंत्री म्हणून काम करत होते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं?” असा थेट सवाल उपस्थित केला आहे. शिर्डी दौऱ्यावर असताना नरेंद्र मोदी यांच्याकडून शरद पवारांवर अप्रत्यक्षरीत्या टीका करण्यात आली आहे.

नरेंद्र मोदी काय म्हणाले?

शरद पवारांवर टीका करत मोदींनी म्हणले की, “महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते केंद्रात कृषी मंत्री राहिले. त्यांनी आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांना साडेतीन लाख कोटी एमएसपीवर धान्य खरेदी केले.आम्ही त्याच कालावधीत साडे 13 लाख कोटी एमएसपीवर खर्च केले. शेतकऱ्यांना योग्य दर देण्याचे काम केले” यावेळी मोदींनी शरद पवारांचे नाव घेतले नसले तरी त्यांच्या या सूचक वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले.

त्याचबरोबर, “२०१४ पूर्वी शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्रीसाठी दलालांवर अवलंबून राहावे लागत होते. अनेक महिने पैशांसाठी वाट पाहावी लागत होती. परंतु आमच्या सरकारने ही दलालशाही मोडीत काढली. आता शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम पाठवली जात आहे. सरळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे मिळत असल्यामुळे दलालीशाही संपली आहे.” असे देखील नरेंद्र मोदी यांनी म्हणले.

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दौरा करत शिर्डीत साईबाबा यांचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी निळवंडे धरणाचे जलपूजन आणि धरणाच्या कालव्याचे लोकार्पण देखील केले. पुढे मोदींनी शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांचे मार्गदर्शन केले. यावेळी बोलतानाच मोदींनी शरद पवारांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. आता या टीकेवर शरद पवारांकडून काय उत्तर दिले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.