वडूज नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते शहाजीराव गोडसे यांचा शिवसेनेत प्रवेश

खटाव | वडूज नगरपंचयातीचे विरोधी पक्षनेते शहाजीराजे गोडसे यांच्या शिवसेनेत प्रवेशाने खटाव तालुक्यात पक्षाला निश्चित ऊर्जा मिळणार असून विकासकामासाठी पक्ष शहाजीराजे गोडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे वक्तव्य शिवसेना पश्चिम महाराष्ट्र संपर्क नेते दिवाकर रावते यांनी केले.

वडूज नगरपंचयातीचे विरोधी पक्षनेते यांनी शिवसेनेत प्रवेशाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सातारा सांगली संपर्क प्रमुख प्रा. नितीन बानूगडे पाटील, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, विधानसभा संपर्क प्रमुख शंकर वीरकर, उपतालुका प्रमुख संजय भोसले, क्षेत्र प्रमुख सचिन भिसे, तालुका प्रमुख युवराज पाटील, उपतालुका प्रमुख महेश गोडसे, बाळासाहेब जाधव, शहर प्रमुख सुशांत पार्लेकर, विभाग प्रमुख आबासाहेब भोसले आदी उपस्थित होते.

शहाजीराजे गोडसे म्हणाले की, चळवळीच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे खटाव तालुक्यातील जनतेला न्याय देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे राज्य विकासाच्या शिखरावर पोचले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या माध्यमातून वडूज शहरात विविध विकास कामे करून शहराचा कायापालट करण्याचा प्रयत्न करू आणि पक्षवाढीसाठी ताकतीने प्रयत्न करणर आहे.