नवी दिल्ली । नोकरी बदलल्यानंतर PF ट्रान्सफर करणे हे देखील महत्त्वाचे काम आहे. अनेकदा लोकं ते करायला विसरतात किंवा माहितीअभावी हे काम रखडते. तुम्हालाही PF ऑनलाइन ट्रान्सफर करायचा असेल तर ही प्रक्रिया सोपी आहे. त्यासाठी अर्ज कसा करायचा ते येथे सविस्तरपणे समजून घ्या.
ऑनलाइन PF ट्रान्सफरसाठी अर्ज करा
यासाठी युनिफाइड मेंबर पोर्टलला https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface भेट द्यावी लागेल. त्यानंतर तुमच्या UAN ने लॉग इन करा.
ऑनलाइन सर्व्हिससाठी वन मेंबर वन ईपीएफ वर क्लिक करा. आता तुम्हाला सध्याची कंपनी आणि PF खात्याशी संबंधित माहितीचे व्हेरिफिकेशन करावे लागेल.
त्यानंतर Get Details या पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला शेवटच्या भेटीचे PF अकाउंट डिटेल्स दिसेल.
तुम्हाला आधीची कंपनी आणि सध्याची कंपनी यापैकी एक निवडावा लागेल. दोनपैकी कोणतीही कंपनी निवडा आणि मेंबर आयडी किंवा UAN द्या.
शेवटी, Get OTP पर्यायावर क्लिक करा, ज्यावरून तुम्हाला UAN मध्ये रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर OTP मिळेल, त्यानंतर तो OTP एंटर करा आणि सबमिट पर्यायावर क्लिक करा.
तुमच्या EPF खात्याची ऑनलाइन ट्रान्सफर प्रक्रिया पूर्ण होईल.
लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी :
EPFO चे कर्मचारी UAN पोर्टल https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ वर अॅक्टिव्हेट करणे आवश्यक आहे
अॅक्टिव्हेट करण्यासाठी वापरलेला मोबाइल क्रमांक देखील अॅक्टिव्हअसावा कारण या क्रमांकावर OTP पाठविला जाईल.
कर्मचाऱ्याचा बँक खाते क्रमांक आणि आधार क्रमांक त्याच्या UAN शी जोडलेला असावा.
आधीच्या नियुक्तीची डेट ऑफ एग्जिट असावी. नसेल तर आधी ती अपडेट करा.
ई-केवायसी नियोक्त्याने आधीच मंजूर केलेली असली पाहिजे. मागील मेंबर आयडीसाठी फक्त एक ट्रान्सफर रिक्वेस्ट स्वीकारली जाईल.
अर्ज करण्यापूर्वी, मेंबर प्रोफाइलमध्ये दिलेली सर्व वैयक्तिक माहिती व्हेरिफाय आणि कन्फर्म करा.