लोणंद नगरपंचायतीसाठी पुन्हा आरक्षण सोडत संपन्न

खंडाळा | लोणंद नगरपंचायतीसाठी सोमवारी आरक्षण सोडत झाली. यामध्ये इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) चा एक प्रभाग कमी झाला असून सर्वसाधारण प्रवर्गाचा एक प्रभाग वाढला आहे. लोणंद नगरपंचायतीच्या सभागृहात लोणंद नगरपंचायतीच्या पंचावार्षिक निवडणुकीसाठी इतर मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण महिलासाठी पुन्हा प्रभागनिहाय आरक्षण सोडत पार पडली.

यावेळी  प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली सोडत झाली. यावेळी मुख्याधिकारी हेमंत ढोकले रोहित निंबाळकर, शंकरराव शेळके, पोपट क्षीरसागर, नीलेश दरगाडे यांनी सोडत पद्धतीने आरक्षण काढले. यावेळी राजेंद्र डोईफोडे,लक्ष्मणराव शेळके, किरण पवार, सुभाषराव घाडगे, सर्फराज बागवान, हर्षवर्धन शेळके, शिवाभाऊ शेळके, लक्ष्मणराव जाधव, रमेश कर्नवर, मस्कुआण्णा शेळके, शिवाजीराव शेळके, विठ्ठल शेळके, हेमंत कचरे, महमद कच्छी, आण्णा जाधव, शंभूराज भोसले, गणीभाई कच्छी, अरूण शेठ गालिंदे, दत्तात्रय खरात, गणेश शेळके, जावेद पटेल, कय्युम मुल्ला, दीपक जाधव, तेजस क्षीरसागर व मान्यवर उपस्थित होते.

लोणंद नगरपंचायतीसाठी प्रभाग आरक्षण पुढीलप्रमाणे

1 – इतर मागास प्रवर्ग महिला

2 – इतर मागास प्रवर्ग महिला

3 – अनु. जाती महिला

4 – सर्वसाधारण

5 – सर्वसाधारण

6 – सर्वसाधारण महिला

7 – अनुसूचित जाती

8 – अनु. जमाती महिला

9 – सर्वसाधारण सर्वसाधारण महिला

10 –  सर्वसाधारण महिला

11 – इतर मागास प्रवर्ग

12 – इतर मागास प्रवर्ग

13 – सर्वसाधारण महिला

14 – सर्वसाधारण महिला

15 – सर्वसाधारण

16 – इतर मागास प्रवर्ग

17 – सर्वसाधारण

You might also like