चेन्नई । सुप्रसिद्ध गायक एसपी बालासुब्रमण्यम यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना तातडीने इस्पितळात भरती करण्यात आलं आहे. इस्पितळातून व्हिडिओ शेअर करून एसपी बालासुब्रमण्यम यांनी स्वतःत कोरोनाची सौम्य लक्षणं दिसत असल्याचं सांगितलं. आपली प्रकृती स्थिर असून चिंतेचं कारण नसल्याचंही त्यांनी आपल्या चाहत्यांना सांगितलं.
एसपी बालासुब्रमण्यम व्हिडिओत म्हणाले कि, ‘गेल्या दोन- तीन दिवसांपासून माझी प्रकृती थोडी बिघडल्यासारखी वाटत होती. छातीत दुखणं आणि सर्दी होता. तसंच ताप येत- जात होता. याशिवाय कोणताही त्रास नव्हता. पण मला या लक्षणांकडे दुर्लक्ष करायचं नव्हतं म्हणून मी कोरोनाची टेस्ट केली. यानंतर डॉक्टरांनी मला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले. त्यांनी मला औषधं दिली आणि सांगितलं की मी घरीच राहू शकतो. त्यांनी १५ दिवसांसाठी सेल्फ क्वारन्टीन होण्यास सांगितलं होतं. पण कुटुंबातील इतर सदस्यांचं आयुष्य मी धोक्यात घालू शकत नाही. याचमुळे मी इस्पितळात भरती होण्याचा निर्णय घेतला. इथे माझी चांगली काळजी घेतली जात आहे.’
https://www.facebook.com/watch/?v=309605840390909
https://www.facebook.com/watch/?v=309605840390909
याशिवाय एसपी बालासुब्रमण्यम यांनी आपल्या चाहत्यांना आणि शुभचिंतकांना आग्रह केला की त्यांना सतत फोन करून किंवा संपर्क करण्याचा प्रयत्न करून त्रास देऊ नये. ‘मला फक्त सर्दी- खोकला आहे. पण अनेकजण मला फोन करत आहे. पण मी साऱ्यांचे फोन उचलू शकत नाही. मी लवकर बरा होईन. कृपया कोणी फोन करू नका’, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”