बिबट्या जेरबंद : कराड तालुक्यातील येणके येथे बिबट्या सापडला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | कराड तालुक्यातील येथे आज शनिवारी दिनांक 27 रोजी वनविभागाने लावलेल्या सापळ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे. बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच गावासह परिसरातील नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

कराड तालुक्यातील तो बिबट्या अखेर जेरबंद

कराड जवळील 15 किलोमीटर अंतरावर आहे गावात हा बिबट्या सापडला आहे. 15 नोव्हेंबर 2021 रोजी येणके गावात एका पाच वर्षांच्या मुलावर हल्ला करून ठार केले होते. त्यानंतर येणके येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. या घटनेच्या दिवशी वनविभागाने त्यादिवशीच येणके येथे 3 सापळे बिबट्याला पकडण्यासाठी लावले होते. या मधील गावातच असलेल्या बळीराम मास्तर यांच्या वाड्यात जवळील शेतात बिबट्या शनिवारी सकाळी सापळ्यात फसला.

बिबट्या सापळ्यात निर्माण झाल्याची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्राणिमित्र रोहित कुलकर्णी, यांच्यासह वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवला होता. मात्र बिबट्या पाण्यासाठी येथील ग्रामस्थांनी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Leave a Comment