हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | बिबट्या प्राणी अतिशय धोकादायक समजला जातो. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये बिबट्याने खूप मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजवला होता. काही लोकांना बिबट्याने मारले होते. त्यामुळे बिबट्याचे नाव ऐकले तरी लोकांचा थरकाप उडू लागला होता. दरम्यान इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश येथील तीर्थंन व्हॅलीमध्ये एक बिबट्या तेथील थांबलेल्या लोकांशी खेळत असल्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. हे व्हिडिओ पाहून अनेक लोकांनी आश्चर्य व्यक्त केले.
तीर्थन वेलीमध्ये बिबट्या आढळल्यामुळे तेथील वाहतूक काही वेळासाठी थांबवली गेली होती. त्यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी लोकांनी गाड्यांमधून बाहेर येऊन त्याचे व्हिडिओ काढत होते. त्यावेळी काही लोकांनी बिबट्या जवळ जाऊन त्याला स्पर्श करण्यास सुरुवात केली असता बिबट्या ही त्यांच्याशी खेळू लागला. हे चित्र पाहण्यासाठी प्रवासी लोकांनी गाड्यांच्या बाहेर येऊन गर्दी केली व व्हिडिओ काढू लागले.
हा व्हिडिओ व्हायरल होत असताना याची दुसरी बाजू संजीव गुप्ता या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याने हा व्हिडीओ ट्विटर वरती मांडली व सोबतच काही वन सेवेतील अधिकाऱ्यांना ही टेक केले होते. ट्विटर मध्ये ते म्हणाले की, भुकेने व्याकूळ असलेला हा बिबट्या प्रवाशांकडे अन्नासाठी आला असताना प्रवासी केवळ त्याचे व्हिडिओ काढण्यात व्यस्त दिसत आहे. या व्हिडिओमुळे बिबट्या कडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन नक्कीच थोडा सौम्य होऊ शकेल.