नांदगावमध्ये बिबट्याची दहशत, वनविभागाच्या टीमची पाहणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

नांदगाव ( ता. कराड) येथे गेल्या 10 ते 12 दिवसापासून बिबट्याची दहशत सुरू आहे. बिबट्या फक्त शिवारातच नव्हे तर लोकांच्या दारात फिरू लागला आहे. याबाबत ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे यांनी वनअधिकाऱ्यांना परिस्थितीचे गांभीर्य सांगितल्यानंतर शनिवारी रात्री वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नांदगावला भेट दिली.

नांदगाव येथे 6 ऑक्टोंबर रोजी बिबट्याने शेळी व बोकड यावर हल्ला करीत त्यांना ठार केले. लोकवस्ती असणाऱ्या भागात झालेल्या हल्ल्याने ग्रामस्थांच्यात भीतीचे वातावरण पसरले. वनविभागाने घटनेचा पंचनामा केला. पण त्यानंतर हा बिबट्या दररोज ग्रामस्थांना कोणत्या ना कोणत्या ठिकाणी बिबट्या दिसत आहे. त्यामुळे शेतातील कामे खोळंबली आहेत. तर लोकवस्तीत रात्रीचा बिबट्या दिसत असल्याने ग्रामस्थ सायंकाळपासूनच घराची दारे बंद करून घेत आहेत.

या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री वनरक्षक अरुण सोळंकी, वनपाल आनंदा सवाखंडे, धनाजी गावडे यांनी बिबट्याचा वावर असलेल्या परिसराची पाहणी केली. कुंभारवाडा येथील बाग नावाच्या शिवारातून बिबट्या येत असल्याने तेथे जाऊन पायांचे ठसे पाहिले. बिबट्या पासून कशी सावधानगी बाळगावी याबाबत ग्रामस्थांना सूचना केल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे, माजी सरपंच प्रकाश पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र कुंभार. हितेश सूर्वे, रघुनाथ जाधव, सचिन कुंभार, विलास कुंभार, रोहन पाटील, सौरभ पाटील, अण्णा शेटके, निलेश कुंभार, गणपत पवार आदींची उपस्थित होती.

 

रविवारी रात्रीही बिबट्याचे दर्शन

रविवारी (दि17) रात्री आठ च्या सुमारास नांदगाव पोलीस औटपोस्ट च्या पाठीमागच्या बाजूला रस्ता पार करीत उसाच्या शेतात जाताना ग्रामस्थांनी बिबट्याला पाहिले .त्यामुळे ग्रामस्थांच्या मधील भीती वाढतच चालली आहे.

 

नांदगाव (ता.कराड )येथे बिबट्याचा वावर असणाऱ्या परिसराची पाहणी करताना वनरक्षक अरुण सोळंकी, वनपाल आनंदा सवाखंडे, प्रशांत सुकरे, प्रकाश पाटील आदी ग्रामस्थ

Leave a Comment