हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निरोगी शरीरासाठी ज्याप्रकारे चांगली राहणीमान, योग्य अन्नपदार्थांची गरज असते त्याचप्रमाणे चांगली आणि आरामदायी झोपही महत्त्वाची आहे. निरोगी जीवनासाठी दिवसातून साधारणपणे 8 तास झोप घेणे आवश्यक आहे असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात. परंतु हल्लीच्या धावपळीच्या दुनियेत अनेक जण झोपेकडे दुर्लक्ष्य करतात. आजकालच्या तरुण वर्गाला तर झोप न लागणे ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. यामुळे डोकेदुखी, पित्ताचा त्रास. चिडचिड यांचं प्रमाण वाढलं आहे. आज आपण जाणून घेऊया 6 तासांपेक्षा कमी झोपेमुळे आपल्यावर आरोग्यावर कोणते परिणाम होतात याबाबत…
वजन वाढणे
तुम्ही जर दररोज 6 तासांपेक्षा कमी झोप घेत असाल तर लठ्ठपणा आणि मधुमेहासारखा आजार होण्याची भीती असते. कमी झोपेमुळे शरीरातील कॉर्टिसोल आणि लेप्टिनची लेव्हल वाढते.
ताण- तणाव आणि नैराश्य वाढते –
कमी झोपेमुळे तुमच्या मनाला आणि शरीराला पुरेशी अशी विश्रांती मिळत नाही. त्याचा थेट परिणाम म्हणजे आपल्यावर ताण वाढतो आणि त्यामुळे रागराग, चिडचिड आणि नैराश्य यासारख्या समस्या निर्माण होतात.
हृदयाला धोका
अपूर्ण झोपेचा आपल्या ह्रदयावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असते. शरीरात चरबी वाढू लागते आणि हृदयाच्या आरोग्यासंबंधित हाय बीपी, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित अन्य समस्यांचा धोका वाढतो. सहा तासांपेक्षा कमी झोपल्याने हृदयविकाराचा झटका आणि दीर्घकाळ स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.
प्रतिकारशक्ती कमी होते –
एका संशोधनानुसार, रोगप्रतिकारतेच आणि झोपेचा जवळचा संबंध आहे. अपुऱ्या किंवा कमी झोपेमुळे आपल्या प्रतिकारशक्तीवर परिणाम पडतो. त्यामुळे शक्यतो शरीराला जेवढ्या तासांची झोप आवश्यक आहे तेवढी घेत रहा.