हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर दौराही नियोजित केला होता. परंतु कराड मधूनच पोलिसांनी सुरक्षेच कारण देऊन त्यांना परत मुंबईला पाठवलं होत. आता पुन्हा एकदा सोमय्या मंगळवारी कोल्हापूर ला जाणार असून याच पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा आणि सोमय्यांना शांततेत दौरा करुद्या असे आवाहन हसन मुश्रीफ यांनी केलं आहे.
सोमय्यांनी केलेलं आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत अस हसन मुश्रीफ यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले. आपला एकही पैसा घोटाळ्याचा नाही. सोमय्यांनी आरोप करत असताना साखर कारखान्याची माहिती घेतली असती तर बरं झालं असत . असे हसन मुश्रीफ यांनी म्हंटल.
राजकीय जीवनामध्ये काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला 20-25 वर्ष चांगलं काम करून आपली प्रतिमा निर्माण करावी लागते. आणि एका क्षणात कोणीतरी येऊन त्याला गालबोट लावावं, वातावरण बिघडवाव ही परिस्थिती काही योग्य नाही.असेही हसन मुश्रीफ यांनी म्हंटल.