जेवणानंतर झोप का येते? काय आहे यामागील नेमकं कारण…

Lifestyle sleepiness
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकवेळा आपण पोटभर जेवण केल्यानंतर लगेच आपल्याला गाढ झोप लागते. जास्तकरून आळशी लोकांच्याबाबतीत झोपेचं प्रमाण हे खूप असत. घरात असताना जेवल्यानंतर थोडावेळ विश्रांती घेऊ शकतात. मात्र, ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी ही मोठी समस्या आहे. दुपारच्या जेवणानंतर बहुतेक लोकांना सुस्ती आणि झोप येते. ही झोप जास्त वेळ मागत नाही. केवळ 15 मिनिटांच्या झोपेनंतरही शरीर ताजेतवाने वाटेल, असे त्यावेळी वाटते यामागचे नेमके कारण काय? आपल्या जेवल्यानंतरच झोप का येते? जाणून घेऊया यामागचे कारण…

जेवल्यानंतर झोप आणि आळस येतो

आपण दिवसभरात अनेकवेळा हलके अन्न खातो. उच्च फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कायम राहते. जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा आपले आतडे आणि संपूर्ण शरीर अन्न पचवण्यासाठी काम करू लागते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ लागते. त्यामुळे व्यक्तीला थकवा जाणवतो आणि नंतर झोप येऊ लागते.

हार्मोन्सद्वारे मेंदूमध्ये डुलकीचा सिग्नल

जेव्हा तुम्ही खाता, तेव्हा तुमच्या अन्नाचे ग्लुकोजमध्ये म्हणजेच उर्जेमध्ये रूपांतर होते जसे ते तुमच्या पचनसंस्थेपर्यंत पोहोचते. अन्नाचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेत, कोलेसिस्टोकिनिन, ग्लुकागन आणि अमायलिन यांसारखे संप्रेरक परिपूर्णतेची भावना निर्माण करतात. हे हार्मोन्स मेंदूमध्ये डुलकीचा सिग्नल देतात, ज्यामुळे व्यक्तीला सुस्तपणा जाणवतो आणि झोपल्यासारखे वाटते. जर वेळ मिळत असेल तर,आपण खाल्ल्यानंतर थोडी विश्रांती घेऊ शकता.

प्रमाणापेक्षा जास्त औषधांचे सेवन

प्रत्येक व्यक्तीसाठी 8 ते 9 तासांची झोप आवश्यक आहे. रात्रीची पूर्ण झोप तुम्हाला दिवसभर ऊर्जा देते. पण जर काही कारणास्तव तुम्हाला रात्रीची झोप पूर्ण झाली नाही तर, दिवसा आळस येईल आणि तुम्हाला झोप येईल. अशा परिस्थितीत अन्न खाल्ल्यानंतर झोप लवकर येते आणि काम करणे कठीण होते. म्हणूनच दररोज पूर्ण झोप घेण्याची सवय लावा. मधुमेह, थायरॉईड, अशक्तपणा इत्यादी काही वैद्यकीय परिस्थिती देखील जास्त थकवा आणि झोपेची भावना होण्याचे कारण असू शकतात. अन्नामध्ये जास्त साखरेचे सेवन केल्यानेही खूप झोप येते आणि काही वेळा काही औषधांमुळे झोपेचा आणि आळसाचा प्रभाव शरीरावर येतो.

हार्मोन्समुळेही येते झोप

आपल्याला जी झोप येते त्यामागचे नेमकं कारण हे रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यानेच येते. त्याशिवाय कधीकधी शरीरातील हार्मोन्स देखील झोपेचे कारण असतात. अन्न खाल्ल्यानंतर, कधीकधी सेरोटोनिन वेगाने तयार होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे व्यक्तीला झोपल्यासारखे वाटते.

झोप नक्की कशावर अवलंबून असते.

जर एखाद्या व्यक्तीने ट्रिप्टोफॅन नावाचे अमीनो अॅसिड असलेले अन्न खाल्ले तर त्यामुळे झोप येऊ शकते. याचे कारण असे की, ते सेरोटोनिनची निर्मिती करण्यास कारणीभूत आहे. ट्रिप्टोफॅन अनेक प्रथिनेयुक्त पदार्थ जसे की चीज, पनीर, पालक, टोफू, सोया, अंडी इत्यादी, या उच्च प्रथिनयुक्त पदार्थांमध्ये ट्रिप्टोफॅन अमिनो आम्ल आढळते. अन्नामध्ये ट्रिप्टोफॅन जितके जास्त असेल, तितके शरीरात झोपेचे नियमन करणाऱ्या सेरोटोनिनची पातळी जास्त असते. सेरोटोनिनची पातळी वाढल्याने झोपेची खात्री असते.