हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेचा उमेदवार रिंगणात आहे. राज्यसभेच्या निवडणुकीवर कोरोनाचे संकट येताना दिसत आहे. कारण आता ताजकीय मंडळींनाही कोरोनाची लागण होऊ लागली आहे. नुकतेच भाजप नेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक अधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहले असून राज्यसभा निवडणुकीत कोरोना बाधित आमदारांनी कसे मतदान करावे याबाबत मार्गदर्शक सूचना द्याव्यात, अशी मागणी केली आहे.
राज्य सभेच्या निवडणुकीत कोरोना बाधित जर आमदार आढळले तर या काळात त्यांनि कशा प्रकारे मतदान करावे, तसेच निवडणूक प्रक्रिया कशा प्रकारे पार पाडावी, याबाबत योग्य त्या मार्गदर्शक सूचना कराव्यात अशी मागणी राज्यसभा निवडणूक अधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे. याबाबत लवकरच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नेमक्या काय सूचना जारी केल्या जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे याचा परिणाम आता राज्यसभा तसेच विधानपरिषदेच्या निवडणुकीवर होण्याची दाट शक्यता आहे. भाजपमध्ये विधान परिषदेचे आमदार ठरवण्यात ज्यांचा शब्द सर्वात महत्त्वाचा ते देवेंद्र फडणवीस सध्या कोरोनाग्रस्त आढळले आहेत. महाराष्ट्रात एकीकडे बऱ्याच वर्षानंतर राज्यसभेची निवडणूक मतदानाद्वारे होत आहे.
त्यामुळे दहा तारखेच्या मतदानाकडे सगळ्यांचे लक्ष आहे. पण त्याआधी विधान परिषदेसाठीचे अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे 9 जून आहे. मात्र, त्यापूर्वी जर अजून काही आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांनी कशा प्रकारे मतदान करावे, याबाबत योग्य त्या मार्गदर्शक सूचना करण्याची मागणी राज्यसभा निवडणूक अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.