कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
राज्यात, देशात खेळाडू तयार होण्यासाठी ग्रामीण भागासह शहरात स्पर्धा राबविल्या पाहिजेत. कराड शहरात युवा नेते रणजित पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित केलेल्या कबड्डी सामन्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील पुरूष व महिला खेळाडू घडविण्यासाठी लिबर्टी मैदानाचा मोठा वाटा असल्याचेही सातारा जिल्ह्याचे पोलिस प्रमुख समीर यांनी सांगितले.
कराड येथील लिबर्टी मैदानावर आयोजित कबड्डी स्पर्धेच्या दरमन्यान समीर शेख बोलत होते. यावेळी रणजित पाटील, सचिन पाटील याच्यासह शहरातील माजी नगरसेवक, पदाधिकारी व कबड्डीप्रेमी उपस्थित होते. यावेळी समीर शेख म्हणाले, मैदानावरील खेळाडूंना मी इथं येऊन पाहिलं आणि मी अक्षरशः भारावून गेलो आहे. इथलं वातावरण पहायला मिळाल त्याच समाधानही आहे. संपूर्ण राज्यभरातुन या स्पर्धेत खेळाडू भाग घेत आहेत ही बाब अभिमानास्पद आहे.
कराड शहरात पोलिसाचा मार्च
कराड शहरातील दत्त चाैक, आझाद चाैक, चावडी चाैक, जोतिबा मंदिर येथून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैक मार्गावर पोलिस प्रमुख समीर शेख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील याच्यासोबत पोलिसांनी मार्च केला. यावेळी गुन्हेगारांवर कराड पोलिसांनी वचक ठेवला आहे. सामान्यांना त्रास देणारांना आम्ही कधीही सोडणार नसल्याचे यावेळी समीर शेख यांनी सांगितले.