कराड | सातारा येथे झालेल्या “खेलो इंडिया” कार्यक्रमांतर्गत पार पडलेल्या जिल्हा कबड्डी स्पर्धेमध्ये लिबर्टी मजूर मंडळाच्या संघाने अजिंक्यपद प्राप्त केले आहे.
देशभरामधील तरुण खेळाडूंमधील गुणवत्ता शोधण्याच्या हेतूने केंद्र सरकारने सुरू केलेल्या या उपक्रमास सातारा जिल्ह्यामधील कबड्डी संघानी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
18 वर्षे वय व 70 किलो वजनी गटांमध्ये अटीतटीने लढल्या गेलेल्या या स्पर्धेमध्ये लिबर्टी मजदूर मंडळाच्या खेळाडूंनी अंतिम फेरी जिंकून अजिंक्यपद मिळवले आहे. लिबर्टी मजदूर मंडळाचे अध्यक्ष सुभाषकाका पाटील, उपाध्यक्ष अरुण जाधव यांच्या हस्ते विजेत्या संघातील खेळाडूंचा यथोचित सत्कार करण्यात आला.
मुनीरभाई सावकार, सुभाष डोळ, अँड. मानसिंगराव पाटील, रमेश जाधव, काशिनाथ चौगुले, प्रशिक्षक सुरेश थोरात, विजय गरुड, इंद्रजीत पाटील, तानाजी पवार, अमित शिंदे, राजू जाधव, दादासाहेब पाटील, विनोद कसबे कार्यक्रमास मान्यवर उपस्थित होते.सदर मान्यवरांनी इचलकरंजी येथे होणाऱ्या विभागीय “खेलो इंडिया” स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.