LIC Aadhaar Shila Plan : महिलांना आत्मनिर्भर बनवते LIC ची ‘ही’ योजना; छोट्या बचतीतून मिळवा लाखोंचा फायदा

LIC Aadhaar Shila Plan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (LIC Aadhaar Shila Plan) LIC (Life Insurance Corporation of India) अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळ ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. LIC ही अत्यंत जुनी आणि विश्वासार्ह विमा कंपनी आहे. त्यामुळे अनेक लोक LIC वर डोळे झाकून विश्वास ठेवतात. LIC कायमच आपल्या ग्राहकांसाठी विविध योजना राबवत असते. ज्यामध्ये ग्राहकांच्या फायद्याचा आणि उज्ज्वल आर्थिक भविष्याचा सारासार विचार केलेला असतो. त्यामुळे LIC ची नवनवीन धोरणे कायमच ग्राहकांसाठी फायदेशीर ठरतात.

LIC तर्फे खास महिलांसाठी एक योजना राबविली जात आहे. जिच्या माध्यमातून महिलांना आर्थिक संरक्षण आणि बचत करण्याची संधी प्रदान केली जात आहे. या योजनेचे नाव LIC आधार शिला योजना असे आहे. चला तर जाणून घेऊया हि योजना कशी काम करते आणि काय फायदे देते?

LIC आधार शिला योजना (LIC Aadhaar Shila Plan)

LIC ची आधार शिला योजना ही एक नॉन- लिंक्ड आणि वैयक्तिक जीवन विमा पॉलिसी आहे. हि पॉलिसी केवळ महिलांसाठी कार्यरत आहे. महिलांच्या स्वावलंबनासाठी LIC ची ही पॉलिसी आर्थिक सहाय्य करते. या पॉलिसीच्या परिपक्वतेवर गुंतवणूक करणाऱ्या महिलेस निश्चित रक्कम प्राप्त होते.

दरम्यान, ही पॉलिसी परिपक्व होण्यापूर्वी गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला तर अशावेळी त्या महिलेच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाते. अर्थात ही पॉलिसी महिलांना मृत्यू लाभ आणि परिपक्वता लाभ दोन्ही प्रदान करते. ज्यामुळे ही पॉलिसी महिलांच्या दृष्टिकोनातून सुरक्षित आणि फायदेशीर सिद्ध होते.

कोण गुंतवणूक करू शकतो ?

LIC ची आधार शिला योजना ही विशेषतः महिलांसाठी सुरु करण्यात आलेली पॉलिसी आहे. त्यामुळे अर्थातच या योजनेत गुंतवणुकीचा अधिकार महिलांकडे राखीव आहे. या योजनेत किमान ८ वर्षे ते कमाल ५५ वर्षे वयोगटातील महिला गुंतवणूक करू शकतात. (LIC Aadhaar Shila Plan)

LIC आधार शिला योजनेचे फायदे

आर्थिक सुरक्षेची हमी – भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) ही पॉलिसी केवळ फक्त महिलांसाठी सुरु केली आहे. ज्याचे मुख्य उद्दिष्ट महिलांना त्यांची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यास मदत करणे हे आहे. त्यामुळे LIC आधार शिला योजना गुंतवणूकदारांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याची हमी दिली जाते.

परिपक्वता लाभ – या पॉलिसीची मुदत पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदाराला योजनेच्या परिपक्वतेचा लाभ दिला जातो. (LIC Aadhaar Shila Plan) अर्थात पॉलिसीधारकाला पॉलिसी मॅच्युरिटी बेनिफिट प्रदान केले जाते.

नॉन- लिंक्ड बेनिफिट – LIC ची विशेषतः महिलांसाठी सुरु करण्यात आलेली ही पॉलिसी नॉन – लिंक्ड आहे. त्यामुळे हि पॉलिसी मार्केटशी जोडलेली नाही. परिणामी या पॉलिसी अंतर्गत गुंतवणुकीवर गॅरंटीड रिटर्न मिळतात.

कर लाभ – LIC आधार शिला पॉलिसी अंतर्गत गुंतवणूकदाराने भरलेल्या प्रीमियमवर त्याला आयकर लाभदेखील उपलब्ध आहेत.

मृत्यू लाभ – (LIC Aadhaar Shila Plan) या पॉलिसीच्या मॅच्युरिटी कालावधी आधी जर पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला तर नमूद केलेल्या नॉमिनीला मृत्यू लाभ प्रदान केला जातो.

LIC आधार शिला पॉलिसीतून ११ लाख रुपयांचा परतावा

LIC आधार शिला योजनेत गुंवणूक करणाऱ्या महिलांना ठेवीवर प्रचंड व्याज मिळतो. ज्यामुळे कालावधी पूर्ण झाल्यानंतर लाखो रुपयांचा फायदा होतो. या योजनेत दररोज केवळ ८७ रुपये गुंतवल्यास १ महिन्यात तुमची २६१९ रुपये इतकी ठेव तयार होते. तर संपूर्ण १ वर्षात ३१,७५५ रुपये इतकी ठेव जमा होते. (LIC Aadhaar Shila Plan) अशाप्रकारे या पॉलिसीच्या १० वर्षांत तुम्ही ३,१७,५५० रुपये इतकी ठेव तयार करता. मग जेव्हा तुमचे वय ७५ वर्ष पूर्ण होईल तेव्हा या पॉलिसीअंतर्गत तुम्हाला ११ लाख रुपयांचा मोठा परतावा प्रदान केला जातो. अशाप्रकारे दररोज ८७ रुपयांची बचत तुम्हाला लाखो रुपयांचा परतावा देऊ शकते.