हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता LIC Housing Finance लिमिटेड (LIC HFL) कडून ग्राहकांना मोठा धक्का मिळाला आहे. कारण आता LIC हाऊसिंग फायनान्सकडून कर्ज घेतलेल्या ग्राहकांना जास्त EMI द्यावा लागणार आहे. हे जाणून घ्या कि, कंपनीने आपल्या प्राइम लेंडिंग रेट (PLR) मध्ये 50 बेस पॉईंटने वाढ केली आहे. ज्यामुळे प्राइम लेंडिंग रेटशी जोडलेल्या होम लोनवरील EMI मध्ये वाढ होईल.
होम लोनवरील नवीन व्याजदर 8 टक्क्यांपासून सुरू
हे लक्षात असू द्यात कि, प्राइम लेंडिंग रेट कर्जासाठीचा हा स्टॅंडर्ड व्याजदर आहे आणि याच्याशी LIC Housing Finance चे होम लोन जोडलेले आहे. यामुळे आता LIC हाऊसिंगच्या होम लोनवरील नवीन व्याजदर 8 टक्क्यांपासून सुरू होईल. 22 ऑगस्ट 2022 पासून हे नवीन व्याजदर लागू झाले आहेत. याआधी होम लोनवरील व्याजदर 7.50 टक्क्यांपासून सुरू होते.
RBI ने रेपो रेट 5.4 टक्के केला
अलीकडेच RBI ने रेपो दरात 0.5 टक्क्यांनी वाढ करून 5.4 टक्के केला आहे. RBI ने मागील तीन पतधोरण आढाव्यात पॉलिसी रेट रेपो 1.40 टक्क्यांनी वाढवला आहे. ज्यानंतर अनेक बँकांकडून आपल्या व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. LIC Housing Finance
EMI मध्ये होणार बदल
LIC Housing Finance कडून एका निवेदनात म्हटले गेले की, व्याजदरातील ही वाढ बाजारातील सध्याच्या परिस्थितीशी सुसंगत आहे. RBI कडून 5 ऑगस्ट रोजी पतधोरण आढाव्यात रेपो दरात 0.5 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.त्यानंतर EMI किंवा होम लोनच्या कालावधीत काही चढ-उतार झाले आहेत.
वेबसाइट वर दिलेल्या माहितीनुसार, LIC Housing Finance कडून 50 लाख रुपयांपर्यंतचे होम लोन 8.05 टक्के व्याजदराने तर 50 लाख रुपयांपासून 2 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज 8.25 टक्के व्याज दराने दिले जाते. मात्र इथे हे लक्षात ठेवा कि, ज्या पगारदार आणि व्यावसायिकांचा CIBIL स्कोअर 700 किंवा त्याहून जास्त आहे त्यांनाच व्याजदर दिला जाईल. तसेच 600-699 दरम्यान क्रेडिट स्कोअर असलेल्यांसाठी 50 लाख रुपयांपर्यंतच्या होम लोनसाठी 8.30 टक्के आणि 50 लाख ते 2 कोटी रुपयांच्या होम लोनसाठी 8.50 टक्के व्याजदर असेल. त्याच बरोबर 600 पेक्षा कमी क्रेडिट स्कोअर असलेल्यांसाठी 50 लाख रुपयांपर्यंतच्या होम लोनसाठी 8.75 टक्के आणि 50 लाख ते 2 कोटी रुपयांपर्यंतच्या होम लोनसाठी 8.95 टक्के व्याजदर असेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.lichousing.com/
हे पण वाचा :
Rakesh Jhunjhunwala यांच्या ट्रस्टची कमान राधाकिशन दमानी हाती !!!
Multibagger Stock : गेल्या 23 वर्षांत ‘या’ शेअर्सने दिले 30,000 टक्के रिटर्न !!!
चुकून डिलीट झालेले मेसेज रिकव्हर करण्यासाठी वापरा WhatsApp चे ‘हे’ नवीन फीचर !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात बदल !!! नवीन दर पहा
Bank FD : आता ‘या’ सरकारी बँकेच्या ग्राहकांना FD वर मिळणार जास्त व्याज, नवीन दर तपासा !!!