नवी दिल्ली । सरकारने देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या IPO साठी लीगल एडव्हायजर म्हणून सिरिल अमरचंद मंगलदासची निवड केली आहे. या प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.Crawford Bayley, Cyril Amarchand Mangaldas, Link Legal, Shardul Amarchand Mangaldas & Co या चार लॉ फर्मकडून प्रेजेंटेशन देण्यात आले.
RFP 16 जुलै रोजी बाहेर आला
या प्रेजेंटेशन नंतर, सिरिल अमरचंद मंगलदासची LIC च्या IPO साठी लीगल एडव्हायजर म्हणून निवड झाली आहे. DIPAM ने यापूर्वीच लीगल एडव्हायजरच्या नियुक्तीसाठी 16 जुलै रोजी RFP लावली होती. बोली लावण्याची शेवटची तारीख 6 ऑगस्ट होती. मात्र, त्यावेळी RFP साठी पुरेसा प्रतिसाद मिळालेला नव्हता.
10 मर्चंट बँकर्स आधीच निवडले गेले आहेत
त्यानंतर 2 सप्टेंबर रोजी नवीन RFP जारी करण्यात आली आणि बोली लावण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर निश्चित करण्यात आली. बोली लावणाऱ्या कंपन्यांनी DIPAM ला 24 सप्टेंबर रोजी प्रेजेंटेशन दिले. देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा IPO मॅनेज करण्यासाठी 10 मर्चंट बँकर्सची आधीच निवड झाली आहे.
जानेवारी-मार्च 2022 च्या तिमाहीत LIC ची लिस्टिंग करण्याचा सरकारचा मानस आहे. सरकार परदेशी गुंतवणूकदारांना LIC मध्ये भाग घेण्याची परवानगी देण्याचा विचार करत आहे.
LIC चौथ्या तिमाहीत लिस्ट होईल
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी जीवन विमा महामंडळाचा IPO या आर्थिक वर्षात येईल. केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी ही माहिती दिली आहे.
सुब्रमण्यम यांनी विश्वास व्यक्त केला आहे की,” चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीपर्यंत LIC ची लिस्टिंग केली जाईल.” इंडियन स्कूल ऑफ बिझनेस (ISB) च्या ‘PGPMAX लीडरशिप समिट, 2021’ मध्ये शनिवारी चर्चा सत्राला संबोधित करताना सुब्रमण्यम म्हणाले की,” चालू आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये खाजगीकरणातून 1.75 लाख कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य आहे”. एअर इंडियाच्या खाजगीकरणाची प्रक्रिया चांगली सुरू आहे. यासाठी दोन निविदा मिळाल्या आहेत. भारत पेट्रोलियम आणि LIC देखील लिस्ट केले जाणार आहेत.